• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : ऑफिसच्या डेस्कवर मनी प्लांट ठेवण्याचे दोन सर्वात मोठे फायदे? तुम्हाला माहितीये का?

June 20, 2026 by admin Leave a Comment


वास्तुशास्त्रामध्ये काही वनस्पतींना अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. यामध्ये तुळस, रबर प्लांट, मनी प्लाटं, शमी अशा काही वनस्पतींचा समावेश आहे. तुळस ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं अत्यंत प्रिय झाडं आहे. ज्या घरात तुळस असते, त्या घरावर सदैव लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद असतो, त्यामुळे अशा घरात कधीही पैशांची कमी जाणवत नाही. त्याचप्रमाणे आणखी एक वनस्पती म्हणजे मनी प्लांट घरात मनी प्लांट लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. ज्या घरात मनी प्लांटचा वेल असतो त्या घरात सतत सकारात्मक ऊर्जा निर्माण होत राहते आणि पैशांची कधीही कमी भासत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. आज आपण ऑफिसच्या डेस्कवर मनी प्लांट ठेवण्याचे नेमके काय फायदे आहेत? याबद्दल जाणून घेणार आहोत.

नकारात्मक ऊर्जा दूर करते – अनेकदा ऑफिसमध्ये कामाचा लोड वाढतो. अतिकामामुळे एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या भोवती निर्माण होते. जेव्हा तुमच्याभोवती नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्याचा परिणाम हा तुमच्या मनावर होतो. मनावरील ताण वाढतो. त्यामुळे तुमची काम करण्याची इच्छा होत नाही. कामात मन लागत नाही. अशा स्थितीमध्ये तुमच्या भोवती असलेली नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं काम मनी प्लांट करतं. मनी प्लांटमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होतेच परंतु त्याचबरोबर तुमच्या आसपासचं वातावरण देखील प्रसन्न राहतं, तुमचा काम करण्याचा उत्साह वाढतो.

करिअरमध्ये प्रगती – वास्तुशास्त्रानुसार ऑफिसच्या डेस्कवर मनी प्लांट ठेवणं हे अत्यंत शुभ आहे. कारण यामुळे तुमच्या भोवतालची सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच इतर अनेक फायदे देखील आहेत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराणचा भारताला मोठा दणका, थेट भारताविरोधात पाकिस्तानला मदत, हादरवणारा खुलासा..
  • शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
  • वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
  • Sugar Price Hike: ना सरकारमुळे, ना दुकानदारांमुळे… तर नागरिकांमुळेच वाढले साखरेचे दर, भलतंच कारण आलं समोर
  • Mumbai Shocking : बायकोबद्दल सारखा तोच विचार डोक्यात येत होता, अखेर नवऱ्याचा कथित बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर ब्लेड हल्ला, मुंबईतली घटना

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in