• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vaibhav Suryavanshi: 700 धावा ठोकणार, अगोदरच ठेवले होते लिहून… फोनमधील ती नोट ते मैदानातील तुफान… वैभव सूर्यवंशीने सर्वच काही सांगितले

June 3, 2026 by admin Leave a Comment

Vaibhav Suryavanshi Notes in Phone: IPL 2026 मध्ये 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने दमदार खेळी खेळली. हा आयपीएल हंगाम त्याने एकट्यानेच गाजवला. या हंगामात ऐतिहासिक कामगिरी बजावयची हे अगोदरच ठरवल्याचे या 15 वर्षीय खेळाडूने सांगितले. या जबरदस्त कामगिरीची स्क्रिप्ट त्याने अगोदरच लिहिली होती. त्याच्या मोबाईलमध्ये ‘नोट्स’ मध्ये आयपीएल हंगामात 700 धावा ठोकायच्या हे त्याने अगोदरच निश्चित केले नाही तर ते प्रत्यक्षात करूनही दाखवले. त्याने अनेक रेकॉर्ड मोडीत काढले. त्याच्या उत्तुंग षटकारांनी प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

700 धावांचे स्वप्न, ठोकल्या 776 धावा

राजस्थान रॉयल्सच्या या वंडर किडने भल्याभल्या गोलंदाजांना पाणी पाजले. आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वीच त्याने फोनमध्ये 700 धावांचा टप्पा पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्येक सामना संपल्यावर वैभव हा फोन उघडून आपण लक्ष्याच्या किती जवळ पोहचलो, हे तपासत होता. त्याने लक्ष्याचा पाठलाग करणे सोडले नाही. त्याने केवळ उद्दिष्टच पूर्ण केले नाही तर त्यापेक्षा अधिक सरस कामगिरी करून दाखवली. त्याने ऑरेंज कॅप मिळवली. या आयपीएल हंगामात त्याने 776 धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 237.30 इतका होता. हा टी-20 क्रिकेटमधील सर्वात खतरनाक रेकॉर्ड मानल्या जातो.

जिओ हॉटस्टारशी बोलताना वैभवने याविषयीचा खुलासा केला. इतके पुरस्कार मिळाल्याने छान वाटत आहे. या हंगामात आपल्याला बरचं काही शिकायला मिळालं. मैदानाच्या बाहेर आणि आत दोन्ही ठिकाणी सरस कामगिरी झाली. मला जर दीर्घकाळ मैदानवर टिकायचं आहे तर मला दमदार कामगिरी करून दाखवावी लागेल. माझ्या खेळात सातत्य ठेवावे लागेल. खेळात सुधारणा करावी लागेल असे वैभव म्हणाला. हा आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी मी फोनमध्ये ‘नोट्स’ ॲपवर किती धावा काढायच्या हे लिहून ठेवले होते. आयपीएल हंगामात
700 धावा चोपून काढायच्या हे ठरवले होते असे वैभवने सांगितले. प्रत्येक सामना संपल्यावर आपण या लक्ष्याचा पाठलाग करताना कुठे आहोत हे मी तपासत होतो. मी हे लक्ष्य गाठू शकलो याचा मला आनंद आहे, असे वैभवने सांगितले.

एक हंगाम आणि 5 मोठी बक्षीसं

बिहारमधील या 15 वर्षीय फलंदाजाने या हंगामात विक्रमांची गुढी उभारली. वैभव याने संपूर्ण टुर्नामेंटमध्ये रेकॉर्डतोड 72 षटकार ठोकले. यासह आयपीएल इतिहासात सर्वात कमी वयातील ऑरेंज कॅप जिंकणारा तो खेळाडू ठरला. त्याने गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनचा (2025 मध्ये 23 वर्ष, 231 दिवस) आणि शुभमन गिलचा (2023 मध्ये 23 वर्ष, 263 दिवस) रेकॉर्ड मागे टाकला. वैभव सूर्यवंशीचा या हंगामातील दबदबा दिसून आला. त्याने जवळपास पाच बक्षीसं पटकावली. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन, सुपर स्ट्राईकर ऑफ द सीझन, ऑरेंज कॅप विनर, सुपर सिक्सेज ऑफ द सीझन यावर त्याने मोहर उमटवली.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut : बंदूक दाखवतोस साल्या, बंदुक तुझ्या ढुंगणात घालीन, नाव घेऊन बोलतो XXXX, संजय राऊतांचं संजय पाटील यांना ओपन चॅलेंज
  • भाजपात प्रवेश केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याने 24 तासांत ठोकला राम राम…; म्हणाले, ‘अडचणीत सापडल्यानंतर पक्ष…’
  • आई-मुलादरम्यान अत्यंत आक्षेपार्ह सीन; ओटीटीवर येताच प्रसिद्ध सीरिज वादात, भडकले प्रेक्षक
  • Eknath Shinde | षटकार मारला, 6 जण खऱ्या शिवसेनेत आले; ऑपरेशन टायगर फुलप्रूफ यशस्वी
  • 24 तासात झरझर घसरला कच्चा तेलाचा भाव… इंधनाचे लवकरच अच्छे दिन? स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in