• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vaibhav Sooryavanshi: आयर्लंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये डेब्यू जरी मिळाला तरीही वैभवला खेळता येणार नाहीच; असं का?

June 28, 2026 by admin Leave a Comment


सलग दोन वेळा टी-20 विश्वचषक जिंकणारा भारतीय संघ आयर्लंडविरुद्धची मालिका गमावू शकतो या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. भारतीय संघात युवा खेळाडूंनी परिपूर्ण भरलेला आहे, सगळ्यांचा खेळ पाहिला तर ताबडतोब आहे. तरीही भारतीय संघाने ही मालिका गमावली हे ऐकून विश्वासच बसत नव्हता. आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 34 धावांनी धक्कादायक पराभव पत्करावा लागला. आता त्यांच्यासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान आहे, या सामन्यात भारतीय संघ वैभव सूर्यवंशीला जरी संघात स्थान दिले तरीही त्याला खेळता येणार नाही. यामागे एक मोठे कारण जबाबदार आहे.

भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी-20 मालिकेचा दुसरा आणि अंतिम सामना रविवार, 28 जून रोजी खेळला जाईल. पहिला सामना गमावल्यानंतर, भारतीय संघासमोर आता हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचे आव्हान आहे. जर ते हा सामना हरले, तर ते मालिकाही गमावतील, जी त्यांच्यासाठी एक नवीन नामुष्की ठरेल. मालिका जिंकण्याची संधी आधीच हातातून निसटून जाईल. अशा परिस्थितीत, भारतीय संघाचे आता एकमेव ध्येय आहे की सामना जिंकून मालिका बरोबरीत आणणे. पण बेलफास्टमधील हवामान मोठी अडचण निर्माण करु शकते.

याचे कारण म्हणजे शनिवारी बेलफास्टमध्ये पाऊस पडल्याने टीम इंडियाच्या सराव सत्रात व्यत्यय आला. भारतीय संघ पूर्णपणे सराव करू शकला नाही आणि यामुळे रविवारीही पाऊस पडण्याची भीती निर्माण झाली आहे, ज्यामुळे सामना रद्द होऊन भारत मालिका गमावेल. बीबीसीच्या हवामान अहवालानुसार, रविवारी दुपारी 1 ते 3 च्या दरम्यान बेलफास्टमध्ये पाऊस पडण्याची 50 ते 65 टक्के शक्यता आहे. भारतीय वेळेनुसार, हा पाऊस सायंकाळी 5:30 ते 7:30 आणि रात्री 8 च्या दरम्यान पडेल. याच वेळी बेलफास्टमध्ये दुसरा टी-20 सामना सुरू होणार आहे. जर हा पाऊस पडला आणि सामन्यावर परिणाम झाला, तर सामना रद्द होऊ शकतो आणि अशा परिस्थितीत टीम इंडिया मालिका 0-1 ने गमावू शकते.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, दुसऱ्या टी-20 सामन्यात वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  भारतीय संघाकडून मैदानात उतरण्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. पहिल्या टी20 सामन्यात वैभव पदार्पण करेल असा चाहत्यांना विश्वास होता, पण तसे झाले नाही आणि भारतीय संघाने टी20 विश्वचषकाप्रमाणेच तीच सलामीची जोडी आणि आघाडीची फळी कायम ठेवली. मात्र, पहिल्या सामन्यात संजू सॅमसन आणि इशान किशन यांनी चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे, दुसऱ्या सामन्यात वैभवची पाळी येते की नाही आता पाऊसावर निर्भर आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ketan Agarwal Case: सियाचा खेळ खल्लास! सर्वात मोठा पुरावा हाती, केतनच्या वडिलांनीच…
  • विजय-त्रिशाच्या लग्नाच्या चर्चा सुरु असताना, प्रसिद्ध अभिनेत्री बनली माजी मुख्यमंत्र्यांची दुसरी बायको
  • मुख्यमंत्री असावा तर असा.. ताफा सोडून थलपती विजय थेट निघाले बसमधून; ‘फिल्मी स्टाइल’वर नागरिकही फिदा!
  • शेती कामासाठी कॅनमधून 40 लिटर डिझेलला परवानगी? बळीराजाला सरकारचा दिलासा? मशागतीला वेग आला असताना मोठी अपडेट काय?
  • मोठा खुलासा! केतनला धक्का दिल्यानंतर या व्यक्तीला केला सियाने पहिला फोन, थेट 15 मिनिटे..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in