• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

शेती कामासाठी कॅनमधून 40 लिटर डिझेलला परवानगी? बळीराजाला सरकारचा दिलासा? मशागतीला वेग आला असताना मोठी अपडेट काय?

June 28, 2026 by admin Leave a Comment


Diesel in Cans Or Barrels: पेसोने मान्यता दिलेल्या कंटेनरमध्येच इंधन देण्याचे आदेश केंद्र सरकारने या महिन्याच्या मध्यात काढले. त्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. दमदार पावसाने शेतीच्या मशागतीला वेग आला आहे. पंपासह टॅक्टरसाठी डिझेलची गरज आहे. केंद्र सरकारच्या प्रतिबंधामुळे सध्ये शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशावेळी प्लास्टिक कॅन, बॅरलमधून किमान 40 लिटर डिझेलची परवानगी देण्याची मागणी होत आहे.

केंद्र सरकारचा त्या आदेशाने अडचण

केंद्र सरकारने एका दिवसात एका व्यक्तीला, वाहनासाठी कमाल 200 लिटर पेट्रोल, डिझेल विक्रीचे आदेश दिलेले आहेत. इराण-अमेरिका संघर्षामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. वाहनांव्यतिरिक्त पेसो मान्यताप्राप्त कंटरनेरमध्येच म्हणजे (प्लास्टिक कॅन आणि बॅरलमध्ये नाही) इंधन देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आता ज्वलनशील पदार्थ सुरक्षा संघटना, पेसो मान्यता प्राप्त कंटनेर शेतकऱ्यांकडे नाहीत. शेतकऱ्यांकडील कॅन आणि बॅरलमध्ये डिझेल मिळत नसल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे.

पण, बाजारात पेसो मान्यता प्राप्त कंटेनर उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह अन्य शेती यंत्रांसाठी कॅनमध्ये डिझेल मिळणार की, नाही, या बाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर खनिज तेलाचे उत्पादन, वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. टंचाईची स्थिती असल्यामुळे किरकोळ विक्रीसाठीच्या पेट्रोल, डिझेलचा वापर उद्योग, व्यावसायिक संस्थांकडून केला जात असल्यामुळे अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त इंधनाची विक्री होताना दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलचा काळाबाजार, साठेबाजी, गैरवापर रोखण्यासाठी एका दिवसात एका व्यक्तीला, एका वाहनासाठी जास्तीत – जास्त २०० लिटर पेट्रोल, डिझेल विक्री करण्याचे आदेश दिले आहेत.

वाहनांशिवाय पेट्रोलियम, ज्वलनशील पदार्थ सुरक्षा संघटनेने (पेसो) मान्यता दिलेल्या कॅन, कंटेनरमध्येच इंधन देण्याचे आदेश दिले आहेत. पण, बाजारात पेसो मान्यता प्राप्त कॅन, कंटेनर उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह अन्य शेती यंत्रांसाठी कॅनमध्ये डिझेल मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

कॅनमधून किमान 40 लिटर डिझेलची परवानगी द्या

पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल-पेट्रोल देण्यास बंदी असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांसाठी कॅनमधून किमान 40 लिटर डिझेल देण्याची परवानगी देणारा सुधारित आदेश तातडीने काढावा अशी मागणी पुण्याच्या मुळशी तालुक्यातील घोटावडे गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्हाधिकारी यांनी तातडीने हस्तक्षेप करावा. फक्त शेतीसाठी कॅनमधून डिझेल देण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतात काम करताना डिझेल अभावी ट्रॅक्टर बंद पडल्यास शेतकऱ्यांना 5-10 किमी ट्रॅक्टर ओढत पंपावर न्यावा लागतो. यामुळे वेळ, पैसा आणि पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याची हेळसांड थांबावी यासाठी शासनाने तातडीने सुधारित आदेश काढावा अशी मागणी राज्यातील शेतकऱ्यांकडून होतं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आधी कुली म्हणून १० रुपये कमवायचा, इडली-डोसा बॅटरद्वारे उभा केला ६८१ कोटींचा बिझनस
  • Special Report : साखर कडू का झाली? इथेनॉलचा संबंध किती? सहा कारणांपैकी दोन कारणं धक्कादायक
  • ना दुधाची विक्री, ना पॅकेटचं दूध; भारताच्या या अनोख्या गावाबद्दल माहित्ये का ?
  • ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील अभिनेत्रीचा श्रावणी लूक चर्चेत; हिरव्या साडीतील सौंदर्याने वेधले लक्ष
  • हिंदू की मुस्लिम, भारतात कोणत्या धर्मातील सर्वाधिक महिला नोकरी करतात? आकडा वाचून चकित व्हाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in