• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुख्यमंत्री असावा तर असा.. ताफा सोडून थलपती विजय थेट निघाले बसमधून; ‘फिल्मी स्टाइल’वर नागरिकही फिदा!

June 28, 2026 by admin Leave a Comment


साऊथ सुपरस्टार सी. जोसेफ विजय (थलपती विजय) जरी तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले असले तरी त्यांचा ‘फिल्मी स्टाइल’ अजूनही चर्चेत आहे. थलपती विजय हे आता चित्रपटात काम करत नसेल तरी सिने स्टाइलने तमिळनाडूच्या लोकांसाठी निर्णय घेताना दिसत आहेत. गुरुवारी त्यांनी तमिळनाडू राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने 300 नवीन बसेसचं उद्घाटन केलं. त्यानंतर ते एका बसमध्ये चढले आणि सर्वसामान्य लोकांसोबत प्रवासाचा आनंद घेतला. यावेळी इतर प्रवासी विजय यांच्यासोबत बसले होते आणि सतत त्यांचे फोटो, व्हिडीओ काढत होते. हेच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तमिळनाडूमध्ये टीव्हीकेच्या ऐतिहासिक विजयानंतर विजय सत्तेवर आले. विरोधी पक्षांना तोंड देत ते आता मुख्यमंत्री म्हणून आपली कर्तव्ये पार पाडत आहेत. गुरुवारी त्यांनी 300 सीएनजी आणि डिझेल बसेसचं उद्घाटन केलं. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बस चालकांशी संवाद साधला आणि बसेसच्या सर्व तपशिलांची पाहणी केली. यावेळी थलपती विजय यांनी पांढरा शर्ट आणि त्यावर काळा गॉगल घातला होता. पडद्यावरील नायकापासून खऱ्या आयुष्यातील ‘हिरो’ बनलेले विजय हे तमिळनाडूच्या जनतेसाठी विविध निर्णय घेताना आणि कृती करताना दिसत आहेत. 4 मे रोजी तमिळनाडूच्या दिग्गजांना पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर विजय यांनी सातत्याने जनहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत.

विजय यांचा व्हिडीओ-

VIDEO | Chennai: Tamil Nadu CM Vijay flags off 300 new Tamil Nadu State Transport Corporation buses, takes a ride in one of the newly launched buses. #TamilNaduNews #CMVijay

(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/GYwLqSM3GA

— Press Trust of India (@PTI_News) June 25, 2026

मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर त्यांनी लगेचच महिला सुरक्षा आणि ड्रग्ज माफियांसंबंधी कायदे लागू केले. याशिवाय रोजगाराशी संबंधित नवीन उपक्रमही त्यांनी सुरु केले. इतकंच नव्हे तर थलपती विजय यांनी विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा राष्ट्रगीत वाजवून सर्वांचं लक्ष वेधलं. या मुद्द्यावरून दुटप्पी भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी डीएमकेवर जोरदार टीकाही केली.

थलपती विजय हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहेत. एकीकडे पत्नी संगीता सोरनालिंगमने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबत त्यांच्या नातेसंबंधाचीही जोरदार चर्चा आहे. निवडणूक निकालाच्या दिवशी त्रिशाने विजय यांच्या घरी जाऊन त्यांची खास भेट घेतली. त्यानंतर शपथविधी सोहळ्यातही ती अत्यंत पारंपरिक अंदाजात पोहोचली होती. काही दिवसांपूर्वीच विजय यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. तेव्हा त्रिशाने त्यांचा केक कापतानाचा फोटोसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केला. या सर्व घडामोडींदरम्यान विजय यांची पत्नी किंवा त्यांची मुलं कुठेच दिसली नाहीत.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टरमधील बदलामुळे तुमच्या पगारात किती वाढ होईल? पूर्ण गणित समजून घ्या…
  • मी माफी मागायला आलोय… उद्धव ठाकरे यांनी मागितली माफी, खासदार संजय जाधव यांच्यावर थेट टीका..
  • जेव्हा तिसरी व्यक्ती नात्यात येते..; गोविंदाच्या अफेअरबद्दल सुनीताने सगळंच सांगितलं
  • Vaibhav Sooryavanshi: गंभीर मोठा डाव खेळणार; वैभवला खेळवण्यासाठी 27 वर्षीय खेळाडूला ड्रॉप करणार? ना अभिषेक, ना संजू मग कोण?
  • धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in