• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विजय-त्रिशाच्या लग्नाच्या चर्चा सुरु असताना, प्रसिद्ध अभिनेत्री बनली माजी मुख्यमंत्र्यांची दुसरी बायको

June 28, 2026 by admin Leave a Comment


दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत. ते दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहायला मिळाले होते. आता ते लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते सी. जोसेफ विजय (थलपती विजय) यांनी 22 जून रोजी आपला 52 वा वाढदिवस साजरा केला. यानंतर या सेलिब्रेशनचे फोटो अभिनेत्री त्रिशाने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले.

एकीकडे विजय आणि त्रिशा यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत मात्र दुसरीकडे एका प्रसिद्ध अभिनेत्री माजी मुख्यमंत्र्यांबरोबर लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्री माजी मुख्यमंत्र्यांची दुसरी पत्नी बनली.

'टगारू' चित्रपटातील कॉन्स्टेबल सरोजा या भूमिकेसाठी ओळखली जाणारी कन्नड अभिनेत्री त्रिवेणी राव सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, या अभिनेत्रीने 19 जून रोजी त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजप खासदार बिप्लब कुमार देब यांच्याशी लग्न केले आहे.

54 वर्षीय बिप्लब कुमार देब यांचे हे दुसरे लग्न आहे. लग्नाचे ठिकाण किंवा या जोडप्याची भेट कशी झाली, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या वृत्तानुसार, बुधवारी आगरतळा येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विवाह सोहळ्याचे स्वागत समारंभ (रिसेप्शन) आयोजित करण्यात आले होते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आधी कुली म्हणून १० रुपये कमवायचा, इडली-डोसा बॅटरद्वारे उभा केला ६८१ कोटींचा बिझनस
  • Special Report : साखर कडू का झाली? इथेनॉलचा संबंध किती? सहा कारणांपैकी दोन कारणं धक्कादायक
  • ना दुधाची विक्री, ना पॅकेटचं दूध; भारताच्या या अनोख्या गावाबद्दल माहित्ये का ?
  • ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील अभिनेत्रीचा श्रावणी लूक चर्चेत; हिरव्या साडीतील सौंदर्याने वेधले लक्ष
  • हिंदू की मुस्लिम, भारतात कोणत्या धर्मातील सर्वाधिक महिला नोकरी करतात? आकडा वाचून चकित व्हाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in