• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

US- Iran Conflict : ज्याची भीती होती तेच घडलं, कोणत्याही क्षणी पुन्हा युद्धाला सुरुवात? मोजतबा खामेनेईंची एन्ट्री, इराणचं नौदल तयार

April 18, 2026 by admin Leave a Comment


स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये पुन्हा एकदा मोठा तणाव निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. वातावरण चांगलंच तापलं आहे. इराणकडून शुक्रवारी व्यापारी जहाजांसाठी स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा एकदा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर तणाव वाढला आणि आज पुन्हा एकदा इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्याच्या निर्णय घेतल्यानंतर दोन व्यापारी जहाजांवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. हा गोळीबार इराणच्या इस्लामी रिवॉल्यूशनरी गार्ड्स (IRGC) च्या गनबोट्सने करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. वीस जहाजं पुन्हा एकदा वापस पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये पुन्हा एकदा मोठा तणाव पहायला मिळत आहे.

दरम्यान दुसरीकडे इराणकडून पुन्हा एकदा अमेरिकेला धमकी देण्यात आली आहे. आता या प्रकरणात थेट इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनई यांची एन्ट्री झाली आहे. त्यांनी अमेरिकेला मोठा इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या देशाच्या सैन्य ताकदीचं कौतुक करताना अमेरिकेला इशारा दिला आहे. ज्या पद्धतीने इराणचे ड्रोन अमेरिका आणि इस्त्रायलवर वेगवान हल्ले करतात त्याचप्रमाणे आमचं नौदल देखील शत्रूंवर हल्ला करण्यासाठी तयार आहे, असं म्हटलं आहे. दरम्यान सध्या पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ होर्मूजवर मोठा तणाव निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे, आणि याचवेळी मोतजबा खामेनई यांचं हे विधान आल्यानं पुन्हा एकदा इराण आणि अमेरिका आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान इराणकडून पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ होर्मूज ओपन करण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र त्यानंतर अमेरिकेनं नाकेबंदी कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं, त्यानंतर आता इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज पूर्णपणे बंद केला आहे, अमेरिकेच्या नाकेबंदी विरोधात आम्ही हे पाऊल उचलल्यांचं इराणने स्पष्ट केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविराम झाला होता. आता हा युद्धविराम संपण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत, मात्र अजूनही यावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाहीये.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विरोधकांना शिक्षा मिळणार, नारी शक्ती विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
  • Narendra Modi Live : महिला सगळं विसरतात पण त्या…नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, लाईव्ह येत सडकून टीका!
  • CSK vs SRH: अभिषेक शर्माने 15 चेंडूत ठोकलं अर्धशतक, अशी कामगिरी करत हैदराबादसाठी नोंदवला विक्रम
  • Weather update : उद्या घराच्या बाहेर पडणं टाळा, राज्यावर मोठं संकट, IMD कडून अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट
  • भारतासाठी अत्यंत मोठी खुशखबर, होर्मुझनंतर इराणचा आणखी मोठा निर्णय, आता एअरस्पेस…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in