• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Narendra Modi Live : महिला सगळं विसरतात पण त्या…नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, लाईव्ह येत सडकून टीका!

April 18, 2026 by admin Leave a Comment


Nari Shakti Bill : लोकसभेत बहुमताचा आकडा न गाठता आल्याने गेल्या मोदी सरकारने आणलेले नारी शक्ती वंदन अधिनियम दुरुस्ती विधेयक मंजूर होऊ शकले नाही. या विधेयकाच्या माध्यमातून मोदी सरकार आपला राजकीय स्वार्थ साधत असल्याचा आरोप करत विरोधकांनी एकजूट होऊन या विधेयकाच्या विरोधात मतदान केले. दक्षिणेतील सर्व पक्षांनी एकत्र येत या विधेयकाल विरोध केला. हे विधेयक फेटाळले जाणे म्हणजे मोदी सरकारला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर लाईव्ह येत देशाशी संवाद साधला. देशातील महिला आता विरोधकांना कधीच माफ करणार नाहीत, असे मोदी म्हणाले. तसेच काँग्रेस हा पक्ष सुधारणांना विरोध करणारा पक्ष आहे, असा हल्लाबोल केला.

काही लोकांसाठी पक्षहीत हेच सर्वस्व

श म्ही खूप प्रयत्न केला, तरी आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही. नारी शक्ती वंदन अधिनियमात दुरुस्ती होऊ शकली नाही. त्यासाठी मी सर्वा माता-भगिनींची माफी मागतो. आमच्यासाठी देशहीत सर्वोच्च आहे. परंतु काही लोकांसाठी पक्षहीत हेच सर्वस्व आहे. पक्षहीत हे देशहितापेक्षा मोठे असेल तर नारी शक्ती, देशाला याचे नुकसान सहन करावे लागते. यावेळीदेखील असेच झाले. काँग्रेस, डीएमके, टीएमसी, समाजवादी तसेच अन्य पक्षांच्या स्वार्थी राजकारणामुळे देशातील महिलांना नुकसान सोसावे लागत आहे, असे मोदी म्हणाले.

महिला सगळं विसरतात पण त्या कधीच….

काल देशातील करोडो महिलांची नजर संसदेवर होती. देशातील महिला पाहात होत्या. मलाही खूप दु:ख झाले. महिलांच्या हितासाठीचा हा प्रस्ताव मंजूर न झाल्यानंतर काँग्रेस, डीएमके, टीएमसे, सपा यासारखे पक्ष आनंदाने टाळ्या वाजवत होते. महिलाकडून त्यांचे अधिकार हिसकावून घेऊन टाळ्या वाजवत होते. या पक्षांनी जे केले ते महिलांच्या सन्मानावर आघात आहे. महिला सगळं विसरतात परंतु त्यांचा अपमान कधीच विसरत नाहीत. म्हणूनच काँग्रेस तसेच इतर पक्षांची भूमिका प्रत्येक महिलेच्या मनात कायम राहणार आहे. देशातील महिला जेव्हा-जेव्हा या नेत्यांना पाहतील तेव्हा-तेव्हा महिलांना हे नेते आठवतील, असे म्हणत मोदी यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : चुकीचं दान तुम्हाला बनवू शकतं कंगाल, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
  • Akshaya Tritiya : अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करा ही खास चांदीची वस्तू, घरावर होईल धनाचा वर्षाव
  • Meta Layoffs : टेक विश्वात खळबळ, मेटामध्ये हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार; मोठी नोकरपात होणार!
  • स्वर्गापेक्षाही सुंदर आहेत भारतामधील ही 5 गावं, आयुष्यात एकदा तरी भेट द्याच
  • आता माणसाचीही होणार धुलाई, जपानच्या या ह्युमन वॉशिंग मशिनची किंमत ऐकाल तर चकीत व्हाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in