• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

स्वर्गापेक्षाही सुंदर आहेत भारतामधील ही 5 गावं, आयुष्यात एकदा तरी भेट द्याच

April 18, 2026 by admin Leave a Comment


भारत हा प्राचीन देश आहे, भारतामध्ये अनेक संस्कृतींचा उदय झाला आणि अस्त देखील झाला. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्या -त्या काळातील लोकांनी आपल्या कलाकृतीने भारताच्या वैभवामध्ये भर घातली. भारतामध्ये आज आपल्याला अनेक अप्रतिम वास्तुकलांचे नमुने बघायला मिळतात, यातील काही तर शेकडो वर्ष जुने आहेत. आज ही ठिकाणं पर्यटनस्थळं म्हणून वेगानं विकसित होत आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणांना भेट देण्यासाठी येतात. यामध्ये विदेशी पर्यटकांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश असतो. ज्या प्रमाणे ही पर्यटन स्थळं आहेत, त्याच प्रमाणे भारतामध्ये अशी देखील काही पर्यटनस्थळं आहेत, जिथे निसर्गाने मुक्तहस्ताने उधळणं केली आहे, ही ठिकाणी स्वर्गापेक्षाही सुंदर भासतात. आज आपण भारतामधील अशा पाच गावांची माहिती जाणून घेणार आहोत, त्या गावांना तुम्ही आयुष्यात किमान एकदा तरी भेट दिलीच पाहिजे.

मावलिनॉन्ग – मावलिनॉन्ग हे गाव मेघालय राज्यात येतं. हे गावं आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव मानलं जातं. या गावावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळणं केली आहे. जर तुम्हाला शहरापासून दूर कुठेतरी जायचं असेल, निवांतपणा हवा असेल तर तुम्ही या गावाला नक्की भेट द्या.

कल्पा – कल्पा हे हिमाचल प्रदेशमध्ये येणारं खूप सुंदर गाव आहे. हे गाव तेथील निसर्ग सौंदर्य आणि शांततेसाठी ओळखलं जातं. किन्नौर जिल्ह्यात येणाऱ्या या गावात तुम्हाला बर्फाने झाकलेले डोंगर, सफरचंदाच्या बागा आणि निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा अनुभवायला मिळतात. यामुळे तुमचं मन प्रसन्न होतं.

खोनोमा – खोनामा हे गाव नागालँड राज्यात आहे. खोनामा हे गाव खूपच सुंदर आणि शांत गाव आहे. भारताचं प्राचीन गाव अशी या गावाची ओळख आहे. तसेच या गावाला ग्रीन व्हिलेज असं देखील म्हटलं जातं. या गावाचं नैसर्गिक सौंदर्य मनाला तृप्त करतं. तसेच हे गाव आपल्या पर्यावरण संरक्षणासाठी देखील ओळखलं जातं. जर तुम्हाला शहराच्या वर्दळी पासून मुक्तता हवी असेल, तुम्ही एकांत शोधत असाल तर तुम्ही या गावाला भेट देऊ शकता.

खिसमर – खिसमर हे गाव राजस्थान मध्ये आहे. हे गाव आपल्या प्राचीन परंपरा आणि साधेपणासाठी ओळखलं जातं. ज्यांना प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करण्याची आवड आहे, असे पर्यटक या गावाला भेट देऊ शकतात. तुम्ही जर या एका गावाला भेट दिली, तर तुम्हाला संपूर्ण राजस्थानची संस्कृती जवळून अनुभवायला मिळू शकते.

पूवर – पूवर हे गाव केरळमध्ये आहे, हे गाव बॅकवॉटर आणि सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी जगप्रसिद्ध आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी खळबळ! भारतीय जहाजांवर फायरिंग होताच सरकारची मोठी कारवाई, इराणच्या… जगाचं लक्ष आता भारताकडे
  • आंदोलकांनी पाकिस्तान सरकारचं नाक दाबलं, हजारो लोक रस्त्यावर… 100 शहरांमध्ये खळबळ
  • KKR vs RR Live Streaming: केकेआरसमोर राजस्थानचं आव्हान, कोलकाता पराभवाची मालिका मोडणार?
  • आयुष्यात कधीच करू नका हा अनर्थ, एक चूक झाल्यास जन्मभर…चाणक्य नीतीचा मोलाचा संदेश वाचाच!
  • रस्ते अपघाताच्या वाढत्या संख्येने सुप्रीम कोर्ट चिंतीत, सरकारला दिले कठोर आदेश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in