• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

KKR vs RR Live Streaming: केकेआरसमोर राजस्थानचं आव्हान, कोलकाता पराभवाची मालिका मोडणार?

April 18, 2026 by admin Leave a Comment

KKR vs RR, IPL 2026 Match Start Time, Live Streaming and Live Telecast: आयपीएल 2026 स्पर्धेतील 28व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने येणार आहे. हा सामना कोलकात्याचं होमग्राऊंड असलेल्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. कोलकाता या स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या शोधात आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात ही संधी घरच्या मैदानावर मिळणार का? असा प्रश्न आहे. कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 5 सामन्यात पराभूत झाले आहेत. पंजाब किंग्स विरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसरीकडे, स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा वरचष्मा आहे आणि सर्व खेळाडू फॉर्मात आहेत. कोलकाता नाईट रायडर्स या स्पर्धेत राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपला पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. तर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आपला पहिला सामना गमावल्यानंतर राजस्थान रॉयल्स पुन्हा विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल.

केकेआर विरुद्ध राजस्थान सामना कुठे पाहाल?

कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना रविवार, 19 एप्रिल रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.00 वाजता होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल. क्रीडाप्रेमी जिओहॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतील.

ईडन गार्डन्स खेळपट्टीचा अहवाल

ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी असेल. सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते. पण फलंदाजांना या खेळपट्टीवर मोठे फटके मारण्यास अनुकूल असेल. या प्रतिष्ठित स्टेडियमवर यावर्षी झालेल्या दोन आयपीएल सामन्यात पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या सुमारे 200 होती. नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा विचार करेल. त्यामुळे नाणेफेकीचा कौल हा महत्त्वाचा ठरणार आहे.

हवामानाचा अंदाज काय?

एक्युवेदर वेबसाइटनुसार , 19 एप्रिल रोजी कोलकातामध्ये पावसाची शक्यता नाही. त्यामुळे 20 षटकांचा खेळ पूर्ण होईल. सामन्यादरम्यान हवामान मुख्यतः निरभ्र राहील आणि तापमान 34 ते 29 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेला होणार चमत्कार, या नशीबवान राशींवर पैशाचा पाऊस; वाचा राशीभविष्य
  • रेल्वेच्या डब्यावर हिरव्या, निळ्या, पिवळ्या रंगाच्या रेषा का असतात? नेमका उपयोग काय?
  • अचानक पैशांची गरज भासल्यास चिंता करू नका, असं मिळवा काही मिनिटात लोन
  • IPL 2026, CSK vs SRH: चेन्नई सुपर किंग्स 194 धावांचा पाठलाग करण्यात अयशस्वी, हैदराबादचा 10 धावांनी विजय
  • GK : भारतासोबत स्वतंत्र झाले हे देश, आज भारताच्या तुलनेत कुठे आहेत ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in