• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026, CSK vs SRH: चेन्नई सुपर किंग्स 194 धावांचा पाठलाग करण्यात अयशस्वी, हैदराबादचा 10 धावांनी विजय

April 18, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 स्पर्धेतील 27व्या सामन्याच सनरायझर्स हैदराबादचा वरचष्मा दिसला. तिसरा सामना जिंकून सनरायझर्स हैदराबादने टायगर अभी जिंदा है हे दाखवून दिलं. तीन सामन्यात पराभव झाल्याने निराशाजनक वातावरण होतं. मात्र हैदराबाद एक्स्प्रेस आता विजयी ट्रॅकवर परतली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय चुकीचा ठरला असं म्हणावं लागेल. कारण इशान किशनला प्रथम फलंदाजी करायची होती आणि त्याच्या मनासारखं झालं. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमवून 194 धावा केल्या आणि विजयासाठी 195 धावांचं आव्हान दिलं. चेन्नई सुपर किंग्स संघ 20 षटकात 8 गडी गमवून 184 धावा करू शकला. हा सामना चेन्नई सुपर किंग्सने 10 धावांनी जिंकला.

चेन्नई सुपर किंग्सचा डाव

चेन्नई सुपर किंग्सने विजयी धावांचा पाठलाग करताना आक्रमक सुरूवात केली खरी.. पण संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड फेल गेले. संजू सॅमसन 7 धावा करून बाद झाला. तर ऋतुराज गायकवाड या सामन्यातही फेल गेला. त्याने 13 चेंडूत 19 धावांची खेळी केली. तर आयुष म्हात्रेने आक्रमक खेळी करत 13 चेंडूत 5 चौकार आणि षटकार मारत 30 धावा केल्या. मॅथ्यू शॉर्ट आणि सरफराज खानची जोडी जमली. या जोडीने 33 चेंडूत 46 धावा केल्या. मॅथ्यू शॉर्ट 34, तर सरफराज खान 25 धावा करून बाद झाला. डेवॉल्ड ब्रेव्हिसला खातही खोलता आलं नाही. शिवम दुबे 21 धावांची खेळी करून बाद झाला. त्यामुळे अंशुल कंबोज आणि जेमी ओव्हरटनवर विजयाची जबाबदारी आली. पण त्यानाही विजयी आव्हान पेलता आलं नाही. जेमी ओव्हरटन 16 धावा करून बाद झाला.

सनरायझर्स हैदराबादचा डाव

सनरायझर्स हैदराबादने या सामन्यात चांगली सुरूवात केली. अभिषेक शर्माने आक्रमक बाणा दाखवला. त्याने 22 चेंडूत 59 धावा ठोकल्या. यात त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले. तर ट्रेव्हिस हेड 20 चेंडूत 23 धावांची खेळी करून बाद झाला. कर्णधार इशान किशनकडून या सामन्यात अपेक्षाभंग झाला. कारण पहिल्याच चेंडूवर विकेट टाकली. तर हेनरिक क्लासेनने मधल्या फळीत डाव सावरला. त्याने 39 चेंडूत 59 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाजी चांगली कामगिरी करू शकला नाही. अनिकेत वर्मा 2, नितीश कुमार रेड्डी 12, सलील अरोरा 13, लियाम लिव्हिंगस्टोन 1, शिवांग कुमार 12 धावा करून तंबूत परतले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टेस्लाची ‘ही’ 6-सीटर इलेक्ट्रिक SUV भारतात धुमाकूळ घालणार, 751 किमीच्या रेंजसह BYD ला देणार टक्कर
  • सुरक्षित प्रवासासाठी कारमधील ‘अँड्रॉइड ऑटो’ आणि ‘ॲपल कारप्ले’चे स्मार्ट फायदे, जाणून घ्या वापरण्याची पद्धत
  • Rohit Pawar | खरातचा मृत्यू अपघातात किंवा आजरपणामुळे होऊ शकतो; रोहित पवारांचे मोठे वक्तव्य
  • Share Market: 35 व्या वेळा डिव्हिडेंड, या शेअरवर 320 टक्के फायदा
  • एप्रिलमध्ये MG Majestor, Mercedes CLA सह अनेक शानदार कार लाँच होणार, पाहा काय वैशिष्ट्ये आणि किंमत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in