• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : चुकीचं दान तुम्हाला बनवू शकतं कंगाल, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

April 18, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की या जगात दाना इतकं दुसरं महान पुण्य नाही. जो व्यक्ती आपल्या आयुष्यात गरजू लोकांना दान करतो, त्याच्या कुळाचा उद्धार होतो. अशा व्यक्तीला त्याच्या आयुष्यात मोठा मान-सन्मान प्राप्त होतो. परंतु दान देताना काही नियमांचं पालन करणं देखील गरजेचं असतं. जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत तर तुमचं आयुष्य देखील उद्ध्वस्त होऊ शकतं. चाणक्य यासाठी एक उदाहरण देतात, चाणक्य म्हणतात दान नेहमी गरजू व्यक्तीलाच दिलं पाहिजे. तरच तुम्ही दिलेल्या दानाचा योग्य फायदा होतो. एखाद्या व्यक्तीला तुम्ही दिलेल्या दानाची गरज नाही, परंतु तरी देखील तुम्ही अशा व्यक्तीला दान दिलं तर असा व्यक्ती तुम्ही दिलेल्या दानाचा किंवा पैशांचा चुकीच्या गोष्टींसाठी उपयोग करू शकतो. त्यामुळे तुम्ही देखील या पापामध्ये अप्रत्यक्षपणे भागीदार होतात, त्यामुळे दान हे नेहमी काळजीपूर्वकच दिलं पाहिजे असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

गरज ओळखा- चाणक्य म्हणतात तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला दान देण्याची इच्छा झाली तर त्याला किती गरज आहे? हे आधी ओळखा. कारण या जगात असे देखील अनेक लोक आहेत, ज्यांना दानाची किंवा तुमच्या पैशांची खरच गरज नसते, ते फक्त उधळपट्टी करण्यासाठी पैसे घेतात. ते तुम्ही त्यांना दिलेले पैसे चुकीच्या मार्गाने खर्च करतात. त्यामुळे खऱ्या गरजूपर्यंत तुमची मदत पोहोचू शकत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

स्वार्थी लोकांना मदत करू नका – चाणक्य म्हणतात या जगात असे देखील काही लोक असतात जे प्रचंड स्वार्थी आणि असमाधानी असतात. तुम्ही त्यांना कितीही मदत केली तरी देखील त्यांचं समाधान होत नाही. ते प्रत्येकवेळी तुमच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवूनच असतात. अशा लोकांना तुम्ही तुमची संपूर्ण संपत्ती जरी दान केली तर देखील त्या लोकांना कमीच पडणार आहे. अशा लोकांना तुम्ही जर मदत करायला जाल तर तुम्ही स्वत: कंगाल व्हाल त्यामुळे अशा लोकांना कधीही मदत करू नका असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

दान कोणाला करावं? चाणक्य म्हणतात ज्या लोकांना खरी गरज आहे, अशाच लोकांना तुम्ही मदत करा, त्यामुळे तुम्हाला पुण्य मिळेल समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अचानक पैशांची गरज भासल्यास चिंता करू नका, असं मिळवा काही मिनिटात लोन
  • IPL 2026, CSK vs SRH: चेन्नई सुपर किंग्स 194 धावांचा पाठलाग करण्यात अयशस्वी, हैदराबादचा 10 धावांनी विजय
  • GK : भारतासोबत स्वतंत्र झाले हे देश, आज भारताच्या तुलनेत कुठे आहेत ?
  • GK : आशियातील सर्वात मोठे वाळवंट, जिथे दिवसा सूर्य ओकतो आग, पण रात्री…
  • नेक्सॉन-ब्रेझाला धोबीपछाड! 5-स्टार सेफ्टी रेटिंग असणाऱ्या या कारने SUV सेगमेंटमध्ये मारली बाजी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in