
Human Washing Machine: जपानने पुन्हा एका आधुनिक तंत्रज्ञानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. जपानच्या Science Inc. ने अशी वॉशिंग मशिन आणली आहे जी कपड्यांच्या ऐवजी माणसांना धुवून काढते. Human Washing Machine नावाची हाय-टेक डीव्हाईस पहिल्यांदा Expo 2025 दाखवण्यात आली आहे. आता या मशिनला पहिल्यांदा बाजारात उतरवण्यात आले आहे.
कशी आहे हाय टेक बाथिंग कॅप्सुल ?
ही मशीन दिसायला एखाद्या सायन्स फिक्शन मुव्ही सारखी दिसते. सुमारे ७.५ फूट लांबीच्या या कॅप्सुलच्या आत बसण्यासाठी एक आरामदायक सीट देण्यात आली आहे. येथे युजर आरामात बसून ऑटोमेटिक वॉशिंगचा अनुभव घेऊ शकतात. माणसाच्या स्वच्छतेसाठी संपूर्ण प्रोसेस १५ मिनिटात संपते.
कोणत्याही मेहनती विना स्वच्छता
ही मशिन आधीच्या पाण्याच्या दबावाच्या जागी मायक्रो बबल्स आणि मंद स्वरुपाच्या वाफेचा वापर करते. हे छोटे- छोटे बुडबुडे त्वचेतून घाण, तेल आणि मृत पेशींना हटवण्याचे काम करतात. खास बाब म्हणजे युजरना काही करण्याची गरज नसते. मशिनच स्वत: संपूर्ण काम करत असते.
स्पा सारखा अनुभव मिळणार
ही मशिन केवळ साफ सफाई न करता माणसाला रिलॅक्स करते. यात हलका प्रकाश आणि सॉफ्ट म्युझिकचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे युजरला स्पा सारखा फील येतो. वॉशिंग मशिन स्वत:च शरीराला सुखवते देखील. त्यामुळे अंघोळ केल्यानंतर टॉवेल वापरण्याची काही आवश्यकता पडत नाही.
माईंड रिलॅक्स करण्याचीही क्षमता
ही मशिन केवळ शरीरच नाही तर मेंदूला देखील आराम देते. यात लावलेले सेंसर हार्ट रेट आणि अन्य शारीरिक संकेतांचे मॉनिटरिंग करतात. जर युजरला कोणत्याही प्रकारचा असहजा किंवा अवघडल्यासारखे वाटत असेल तर ही मशिन स्वत:च प्रोसेसला एडजस्ट किंवा रोखू शकते.
किंमत ऐकून चाट पडाल
हे तंत्रज्ञान सध्या नवीन असल्याने प्रचंड महाग आहे. या मशिनची किंमत सुमारे ६० दशलक्ष येन ( सुमारे ३ कोटीहून जास्त ) सांगितले जात आहे. कंपनी सुरुवातीला या मशिनचे केवळ ४० ते ५० युनिटच तयार करणार आहे.
कुठे घेता येईल ट्रायल
या मशीनला सर्वात आधी ओसाका येथील एका लक्झरी हॉटेलने खरेदी केले आहे. येथे उतरणारे पाहुणे याचा अनुभव घेऊ शकणार आहेत. या शिवाय टोकियो मध्ये एका इलेक्ट्रॉनिक स्टोअरमध्ये याचा डेमो ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे लोक येथे जाऊन ट्राय करु शकतात.
भविष्यात हे तंत्रज्ञानात सर्वसामान्यांना मिळणार ?
Expo 2025 मध्ये या अनोख्या वॉशिंग मशिनला पाहण्यासाठी आणि आजमावण्यासाठी हजारो लोकांनी रुची दाखवली आहे. मात्र याची जास्त किंमत आणि मर्यादित उपलब्धतेने सध्या यास मशिनला सर्वसामान्यापासून दूर ठेवले आहे. परंतू तरीही ही मशिन भविष्यातील पर्सनल केअरची नवा ट्रेंडची झलक जरुर दाखवते.
Leave a Reply