• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CSK vs SRH: अभिषेक शर्माने 15 चेंडूत ठोकलं अर्धशतक, अशी कामगिरी करत हैदराबादसाठी नोंदवला विक्रम

April 18, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 स्पर्धेतील 27व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माच्या फलंदाजीची धार पाहायला मिळाली. या सामन्यात त्याने चौकार आणि षटकारांचा वर्षावर केला. तसेच 15 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. (Photo: Sunriser Hyderabad Twitter)

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात जलद अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नाव नोंदवलं आहे. त्याने अर्धशतकी खेळी करताना 5 चौकार आणि 4 षटकार मारले. म्हणजेच त्याने 44 धावा फक्त 9 चेंडूत केल्या. तर सहा धावांसाठी 6 चेंडू घेतले. (Photo: Sunriser Hyderabad Twitter)

सनराझर्स हैदराबादसाठी कमी चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा मान त्याने मिळवला आहे. यापूर्वी त्याच्याच नावावर असलेला विक्रम मोडीत काढला आहे. 2024 मध्ये त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध 16 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. तर ट्रेव्हिस हेडने 2024 मध्ये दोन 16 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. (Photo: Sunriser Hyderabad Twitter)

अभिषेक शर्माने 22 चेंडूत 59 धावांची खेळी केली. त्याने त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले. 268.18 च्या स्ट्राईक रेटने त्याने 59 धावांची खेळी केली. जेमी ओव्हरटनच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनने त्याचा झेल पकडला आणि बाद झाला. (Photo: Sunriser Hyderabad Twitter)

आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक यशस्वी जयस्वालच्या नावावर आहे. त्याने 2023 मध्ये केकेआरविरुद्ध 13 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. त्यानंतर केएल राहुल, पॅट कमिन्स आणि रोमारियो शेफर्ड यांनी 14 चेंडूत अर्धशतक ठोकलं आहे. तर 15 चेंडूत अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या पंगतीत अभिषेक शर्मा बसला आहे. (Photo: Sunriser Hyderabad Twitter)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Meta Layoffs : टेक विश्वात खळबळ, मेटामध्ये हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार; मोठी नोकरपात होणार!
  • स्वर्गापेक्षाही सुंदर आहेत भारतामधील ही 5 गावं, आयुष्यात एकदा तरी भेट द्याच
  • आता माणसाचीही होणार धुलाई, जपानच्या या ह्युमन वॉशिंग मशिनची किंमत ऐकाल तर चकीत व्हाल
  • काँग्रेसने पापाचं प्रायश्चित करण्याची संधी गमावली…, महिला आरक्षण विधेयकावरून पंतप्रधान मोदींचा थेट निशाणा
  • इराण युद्धाने नवा धोका वाढला, शॅडो वॉरची भीती, तपास यंत्रणा झाल्या अलर्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in