• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

काँग्रेसने पापाचं प्रायश्चित करण्याची संधी गमावली…, महिला आरक्षण विधेयकावरून पंतप्रधान मोदींचा थेट निशाणा

April 18, 2026 by admin Leave a Comment


संसदेमध्ये शुक्रवारी महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिलावर मतदान पार पडलं. हे बिल मंजूर होण्यासाठी दोन तृतियांश मतदानाची आवश्यकता होती. मात्र सत्ताधाऱ्यांना बिलाच्या बाजूने तेवढी मत मिळवण्यात अपयश आलं. बिलाच्या बाजूने 298 मतं पडली तर बिलाच्या विरोधात 230 मतदान झालं. हे बिल मंजूर होण्यासाठी 360 मतांची गरज होती, मात्र 62 मत कमी पडल्यानं संसदेमध्ये हे बिल नामंजूर झालं. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मला अशी अशा होती की काँग्रेस आपली जुनी चूक सुधारेल, आपल्या पापाचं प्रायश्चित करेल परंतु त्यांनी ही देखील संधी गमावली आहे. काँग्रेसकडून प्रादेशिक पक्षाच्या पाठीवर बसून स्वत:ला वाचावण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

महिला आरक्षण विधेयकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षांनी या मुद्द्याला द्वेष आणि छोट्या राजकीय विचाराचा बळी बनवला आहे. मात्र मी जनतेला असा विश्वास देतो की हा काही या लढाईचा शेवट नाहीये, ही तर लढाईची सुरुवात आहे. भाजप आणि एनडीए तुमच्या अधिकारांसाठी सतत लढत राहतील. काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन बिलावर सातत्याने खोट बोलत आहेत, असा हल्लाबोल यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसने हे विधेयक तांत्रिकदृष्या अडकून महिलांच्या अधिकारांवर दरोडा टाकला आहे. देशाला आता काँग्रेसच्या राजकारणाचा पॅटर्न समजला आहे. विरोधी पक्षांना कधीही असं वाटत नाही की त्यांचं कुटुंब सोडून इतर महिलांना संधी मिळावी, त्या पुढे जाव्यात. डिलिमिटेशननंतर महिलांना जास्त जागा मिळणार आहेत, त्या पुढे जाणार आहेत, त्यामुळेच काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी या बिलाला विरोध केला आहे, त्यामुळे महिला या पक्षांना कधीही माफ करणार नाहीत असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

 

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेला होणार चमत्कार, या नशीबवान राशींवर पैशाचा पाऊस; वाचा राशीभविष्य
  • रेल्वेच्या डब्यावर हिरव्या, निळ्या, पिवळ्या रंगाच्या रेषा का असतात? नेमका उपयोग काय?
  • अचानक पैशांची गरज भासल्यास चिंता करू नका, असं मिळवा काही मिनिटात लोन
  • IPL 2026, CSK vs SRH: चेन्नई सुपर किंग्स 194 धावांचा पाठलाग करण्यात अयशस्वी, हैदराबादचा 10 धावांनी विजय
  • GK : भारतासोबत स्वतंत्र झाले हे देश, आज भारताच्या तुलनेत कुठे आहेत ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in