• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tukaram Mundhe: ‘मुंढेसाहेब जरा लक्ष द्या, त्या बायका मिसरी लावतात अन् गावभर…’ चिुमकल्याचा तुकाराम मुंढेसाठी खास व्हिडिओ

August 15, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी राज्यभरात विकल्या जाणाऱ्या भेसळयुक्त पदार्थांवर धडाधड कारवाई केली. दुकान, हॉटेल आणि औषध बनवणाऱ्या कंपनी आता धासतावल्या आहेत. तुकाराम मुंढे दरदिवसी भेसळयुक्त पदार्थांची भेसळ बाहेर काढताना दिसतायेत. मुंढेच्या या कामगिरीमुळे सामान्य जनता त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. तर अनेक जण स्वत:हून त्यांना त्यांच्या शहरात येऊन सुरु असलेल्या गैरप्रकारावर धाड टाकण्यासाठी आमंत्रण देत आहेत. आता पुन्हा एकदा एका लहानग्या चिमुकल्याने तुकाराम मुंढे यांना आपल्या गावात येण्याची विनंती केली आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

याच पार्श्वभूमीवर एका लहान मुलाचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. त्याने मुंढेंना तोंडाला लावायची जी मशेरी असते ती बंद करण्याची विनंती केली आहे. तो म्हणतोय, “महिला तोंडामध्ये मशेरी भरतात आणि गावभर लोकांची मापं काढत फिरत असतात. ” हा व्हिडीओ खूपच मजेशीर आहे. त्या लाहन मुलाचा बोलण्याचा अंदाज फारच मजेशीर असल्याने व्हिडिओ सोशलल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Namdev Patil (@namdev.patil.5015)

हा व्हिडीओ namdev.patil.5015 या इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आला आहे. “तुकाराम मुंढे साहेब… त्या मिसरीकडे सुद्धा लक्ष द्या. अहो, बायका तोंडामध्ये बुकणा भरतात मिसरीचा आणि मग सगळ्या गावाची मापं काढत बसतात,” या मजेशीर अंदाजात त्याने व्हिडिओ शूट केला आहे आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Namdev Patil (@namdev.patil.5015)

तंबाखू भाजून त्याची पावडर तयार केली जाते. नंतर या पावडरचा वापर दात घासण्यासाठी केला जातो. या पावडरला गावाकडच्या भाषेत मशेरी किंवा मिसरी असे गावकरी म्हणतात. वर्षानुवर्षे गावकरी काही लोक किंवा वृद्ध मंडळी टूथपेस्टऐवजी मशेरीने दात घासतात. पण वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, तंबाखूजन्य पदार्थांनी दात घासणं हे आरोग्यासाठी योग्य नाही. याचा विपरीत परिणाम शरीरावर पडतो.

या अवघ्या 30 सेकंदांच्या व्हिडीओवर आतापर्यंत 4 हजारांहून अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत. कोणी म्हणतंय, “मुंढे साहेब, या मुलाच्या तक्रारीकडे तातडीनं लक्ष द्याची गरज आहे.” तर कोणी म्हणतंय, “बाळा, उगाच नको ती तक्रार करू नकोस नाहीतर गावातील बायका लाटणं घेऊन तुझ्याच मागे लागतील.”





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Bus Accident : भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरमध्ये घुसली, 5 ठार 20 जखमी
  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in