• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tukaram Mundhe: बुलढाण्यात मोठे अधिकारी पैसे खाऊ राहिले, घोटाळे सुरुये… 75 वर्षीय आजीचा तुकाराम मुंढेंसाठी खास व्हिडीओ

August 13, 2026 by admin Leave a Comment


सध्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची संपूर्ण राज्यासह देशभर चर्चा रंगली आहे, राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम सध्या राबवत आहे. अन्न व औषध प्रशासनानेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या राज्यभरातील धडाकेबाज कारवायांची चर्चा आता संपूर्ण देशात सुरु आहे. देशभरातील अन्न माफियांना आता चांगलीच धडकी भरली आहे. अनेक लोक तुकाराम मुंढे यांना स्वत:हून फोन करत, व्हिडिओच्या माध्यामातून आपल्या तक्रारी सांगत आहे. याचदरम्यान, बुलढाण्यातील एका आजीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओची आता जोरदार चर्चा रंगली आहे. बुलढाण्यात अनेक फळ आणि खाद्यपदार्थात भेसळ सुरु आहे. या भेसळीवर येथील अधिकारी कुठलीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे तुकाराम मुंढे साहेब तुम्ही एकदा बुलढाणा आणि खामगावचा दौरा करा अशी विनंती आज्जीने केली आहे. या 75 वर्षीय आजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आजी म्हणाल्या की,” तुकाराम मुंढे साहेब तुम्ही एकदा बुलढाण्या या. बुलढाणा जिल्ह्यातील मोठे साहेब लोक पैसे खातात. ते काहीच कारवाई करत नाही. सरकारी दवाखान्यात मोठा घोटाळा सुरु आहे. कुणीही त्यावर आवाज उठवत नाही. त्यामुळे तुम्ही एकदा बुलढाण्यात या, माझी एवढीच विनंती आहे तुमच्याकडे, असं आजी एका व्हिडीओमध्ये बोलत आहे.” तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये आजी म्हणाल्या की, “तुकाराम मुंढे साहेब इकडे खूप भेसळ सुरु आहे. दुकानातील तेलामध्ये, केळीमध्ये-पपईमध्ये औषध टाकली जात आहे. यावर इकडचे अधिकारी काहीच कारवाई करत नाही, फक्त पैसे खातात.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Aai chi dhivani  (@mothi_devechi_seve_kari)

अन्न व औषध प्रशासनाने गोंदिया जिल्ह्यातील 4 आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांवर कारवाई केली आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 तसेच नियम 1945 अंतर्गत परिशिष्ट-‘टी’मधील तरतुदींचे गंभीर उल्लंघन आढळून आले. या 4 कंपन्यांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही तपासणी मोहीम अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sugar price hike : मोठा निर्णय! 5 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही, डी मार्ट, बिगबास्केट आणि ब्लिंकिट… कंपन्यांनी बंदी का घातली?
  • कंत्राटदार संघटनेचा सरकारला मोठा इशारा, मुंबईतील कंत्राटदाराने वैतागून संपवली जीवनयात्रा..
  • समंथासोबत घटस्फोट तर, दुसरी बायको नागा चैतन्यपासून राहते दूर! थक्क करणारं कारण समोर
  • समंथासोबत घटस्फोट तर, दुसरी बायको नागा चैतन्यपासून राहते दूर! थक्क करणारं कारण समोर
  • Lalbaugcha Raja : कशाला अंबानी पाहिजे तुम्हाला? असा काय मोठा सल्ला देतात,जो..मनसेचा ‘लालबागचा राजा’ मंडळाला रोखठोक सवाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in