• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

समंथासोबत घटस्फोट तर, दुसरी बायको नागा चैतन्यपासून राहते दूर! थक्क करणारं कारण समोर

August 26, 2026 by admin Leave a Comment


झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. आता अभनेता नागा चैतन्य याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नागा चैतन्य याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिला घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्या याने अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिच्यासोबत लग्न केलं. अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 2024 मध्ये शोभिता आणि नागा चैतन्य यांनी लग्न केलं. आता लग्नाच्या दोन वर्षांनंतर शोभिता हिने खासगी आयुष्याबद्दल मोठा निर्णय घेतला आहे . शोभिता हिने सांगितल्यानुसार, दोघांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे लग्नाच्या आधी एक वर्ष दोघे फार कमी भेटले.

महिन्यातून फक्त एकदा व्हायची भेट…

नुकताच झालेल्या एका मुलाखती शोभिता धुलिपाला हिने लग्न आणि लग्नापूर्वीच्या दिवसांबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. अभिनेत्रीने असा विचार कधीच नव्हता केला की, तिचं लग्न कोणत्या अभिनेत्यासोबत किंवा तिच्याच राज्यातील कोणत्या व्यक्तीसोबत होईल. तरीही, आपल्या लग्नात आपली संस्कृती प्रतिबिंबित व्हावी अशी तिची नेहमीच इच्छा होती आणि हे तिचं बालपणापासूनचं स्वप्न होतं.

लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल बोलताना शोभितानं सांगितलं की, डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या लग्नानंतर अवघ्या काही आठवड्यांतच ती तमिळनाडूमध्ये एका शूटिंगसाठी गेली आणि तिथे 150 दिवसांहून अधिक काळ राहिली. परिणामी, लग्नाच्या पहिल्या वर्षात तिला नागा चैतन्यला कदाचित महिन्यातून एकदाच भेटता आलं. नागा आणि चैतन्य कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात.

घटस्फोटानंतर नागाच्या आयुष्यात शोभिताची एन्ट्री

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं. पण कधीच नात्याची अधिकृत घोषणा केली नाही. 2022 मध्ये दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला… ऑगस्ट 2024 मध्ये त्यांनी साखरपुडा केला आणि नात्याची अधिकृत घोषणा केली.

त्यानंतर, 4 डिसेंबर 2024 रोजी हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत नागा चैतन्य आणि शोभिता यांनी तेलगू रितीरिवाजांनुसार विवाह केला. यापूर्वी चैतन्यचे अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्याशी लग्न झालं होतं; लग्नानंतर चार वर्षांनी 2021 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Khavdya Donger : खवड्या डोंगर प्रकरणात हैराण करणारा ट्विस्ट, कुणालला जीव द्यायचाच नव्हता? मोठं कारण आलं समोर
  • मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?
  • Tukaram Mundhe: रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच मित्रांनी काढला तुकाराम मुंढेंचा फोटो; पुढे जे केलं ते पाहून हसू आवरणार नाही
  • मोठी बातमी! महाराष्ट्र ड्रग इंस्पेक्टर परीक्षा रद्द, पेपर लीकचा आरोप झाल्यानंतर मोठा निर्णय
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in