• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंनी दिला मोठा दणका ! Blinkit, Zepto आणि Instamartच्या 14 फूड सेंटरवर FDA चा बडगा

August 15, 2026 by admin Leave a Comment


अन्न तसेच औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe ) यांची सध्या सगळीकडेच चर्चा आहे, त्यांनी कारवाईचा जोरदार धडाका लावला आहे. हाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनानकडून (FDA) अनेक धाडसत्र  सुरू असून त्यांमुळे अनेकांचं धाबं दणाणलं आहे. याआधी FDA मोठमोठ्या फूड जॉईंट्सवर कारवाई केली असून आता एफडीएने क्विक-कॉमर्स कंपन्यांना मोठा दणका दिला आहे. Blinkit , Zepto आणि Instamartशी निगडीत 14 फूड बिझनेस सेंटरचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. राज्यभरात तपासणी करण्यात आली असून, त्यादरम्यान अन्नसुरक्षा, स्वच्छता, तापमान नियंत्रण आणि खाद्यपदार्थांच्या साठवणुकीसंदर्भात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याचे समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार, 13 ऑगस्ट रोजी FDA ने महाराष्ट्रातील ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे खाद्यपदार्थांची साठवणूक, विक्री आणि डिलिव्हरी करणाऱ्या 86 केंद्रांची तपासणी केली. या कारवाईत 60 सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर एका केंद्राला काही काळासाठी कामकाज बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

निलंबित करण्यात आलेल्या 14 परवान्यांपैकी Blinkit चे पाच, Zeptoचे पाच आणि Instamartचे दोन परवाने आहेत. याशिवाय भगवती स्टोअर्स आणि Swinsta Ent Pvt Ltd यांच्या प्रत्येकी एका परवान्यावरही कारवाई करण्यात आली.

तपासणीत आढळल्या या त्रुटी

तपासणीदरम्यान खाद्यपदार्थांची साठवणूक, तापमान नियंत्रण, स्वच्छता, कीटक नियंत्रण (पेस्ट मॅनेजमेंट), अन्न हाताळणारे जे कर्मचारी होते त्यांची वैयक्तिक स्वच्छता, अन्नसुरक्षा नोंदी, परवान्याचे प्रदर्शन आणि इन्व्हेंटरी व्यवस्थापनातील FIFO या नियमांचे पालन यावर विशेष लक्ष देण्यात आलं होतं.

मुदत संपलेले खाद्यपदार्थही आढळले

पुण्यातील लोहेगाव येथे Zeptoच्या एका आउटलेटचा परवाना FDA कडून निलंबित करण्यात आला. कारण युज बाय अर्थात एक्सपायरी डेट संपल्यानंतरही काही खाद्यपदार्थ तेथे साठवून ठेवले होते, असं तपासणीदरम्यान आढळलं. याशिवाय स्वच्छतेची खराब स्थिती, कीटक नियंत्रणातील त्रुटी आणि वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचंही आढळून आलं. सुनावणीदरम्यान कंपनीने दिलेले स्पष्टीकरणही समाधानकारक नसल्याचे रेग्युलेटरने सांगितलं.

Swinsta Ent Pvt Ltd च्या केंद्रात काय होत्या त्रुटी ?

पुण्यातच Swinsta Ent Pvt Ltd द्वारे चालवण्यात येणाऱ्या आणखी एका केंद्रात झुरळांचा प्रादुर्भाव, गोठवलेल्या खाद्यपदार्थांसाठी आवश्यक कोल्ड-चेन मेटेंनन्स राखण्यात अपयश, तसेच स्वच्छता आणि कीटक नियंत्रणाच्या उपाययोजनांमध्ये त्रुटी असल्याचं आढळून आलं.

Blinkitच्या स्टोअरमध्ये आढळलेल्या त्रुटी

तर मुंबईतील मालाड (पश्चिम) येथील Blinkit च्या एका केंद्रात चिलरचे तापमान हे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचं आढळू आलं. तसेच सुमारे 40 अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी झालेली नव्हती आणि त्यासंबंधीच्या नोंदीही उपलब्ध नव्हत्या, असंही तपासणीत आढळून आलं. एवढंच नव्हे तर अनेक कर्मचारी हातमोजे, एप्रन आणि डोक्यावर घालायचे कव्हर यांसारख्या सुरक्षा साधनांचा वापर करत नव्हते, असं FDAने नमूद केलं. स्टोरेज रॅक तुटलेले होते, सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं तर वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ योग्य पद्धतीने वेगळे ठेवले नव्ते, अशा अनेक त्रुटी होत्या.

घाटकोपरमधील Blinkitच्या आणखी एका केंद्रात ड्रेनेज व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, तापमान नियंत्रण आणि हाऊसकीपिंगमध्ये बऱ्याच त्रुटी आढळल्या. तपासणीदरम्यान या आउटलेटला फक्त 46 टक्के गुण मिळाले आणि म्हणूनच ते नियमांचे पालन करण्यात अपयशी ठरल्याचं नमूद करण्यात आलं.

मुलुंड -अंधेरीतही कारवाईचा धडाका

मुलुंड आणि गोरेगाव येथील Zeptoच्या केंद्रांच्या तपासणीत खाद्यपदार्थांची साठवणूक, तापमान व्यवस्थापन, स्वच्छता आणि परवाना प्रदर्शित करण्यासंबंधी त्रुटी आढळल्या. अंधेरीतील एका Instamart आउटलेटमध्ये तपासणीदरम्यान खाद्यपदार्थांची पाकिटं तर डायरेक्ट जमिनीवर ठेवलेली दिसली. तिथे न धड साठवणुकीसाठी पुरेशी जागा नव्हती तसेच मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे आणि स्वच्छता तसेच तापमान नियंत्रणातही त्रुटी असल्याचे आढळून आलं. या तपासणी मोहिमेत डिलिव्हरी ऑपरेशन्सचीही तपासणी करण्यात आली.

कराडमध्ये 125 डिलिव्हरी रायडर्सची तपासणी

सातारा जिल्ह्यातील कराड येथील Blinkitच्या एका स्टोअरमध्ये अधिकाऱ्यांनी 125 डिलिव्हरी रायडर्सची तपासणी करण्यात आली. मात्र त्यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड्स अर्थात ओळखपत्रं आणि वैद्यकीय तंदुरुस्तीची नोंद नव्हती, असं आढळलं. डिलिव्हरी बॅग आणि बॉक्सवर FSSAI परवाना प्रदर्शित करण्यात आलेला नव्हता. या त्रुटी दूर होईपर्यंत कराड केंद्रातून दुचाकीद्वारे डिलिव्हरी बंद ठेवण्याचे निर्देश FDAने दिले आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Bus Accident : भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस लोखंडी सळ्यांनी भरलेल्या कंटेनरमध्ये घुसली, 5 ठार 20 जखमी
  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in