• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Trisha Krishnan: जा आधी पैसे कमव.. थलपती विजय यांच्या पत्नीने घटस्फोट मागे घेताच त्रिशा कृष्णनची पोस्ट चर्चेत

August 12, 2026 by admin Leave a Comment


तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय उर्फ थलपती विजय यांची पत्नी संगीता सोरनालिंगमने त्यांच्याविरोधात दाखल केलेली घटस्फोटाची याचिका मागे घेतली आहे. चेंगलपट्टू जिल्हा कुटुंब न्यायालयाने संगीताची याचिका मागे घेण्याची विनंती स्वीकारून हे प्रकरण बंद केलं आहे. संगीताने घटस्फोट मागे घेताच आता अभिनेत्री त्रिशा कृष्णनची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. त्रिशा तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये अनेकदा पोस्ट शेअर करत असते. मात्र या पोस्टची वेळ नेहमी संगीताने घटस्फोट मागे घेतल्यानंतरची असल्याने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं गेलं आहे. थलपती विजय आणि त्रिशा यांच्यातील नातं नेहमीच चर्चेत राहिलं आहे. जरी या दोघांनी त्यावर कधीही भाष्य केलं नसलं तरी विजय यांच्या पत्नीने घटस्फोटाची याचिका दाखल केल्यानंतर हे दोघं अनेकदा एकत्र दिसले आहेत.

त्रिशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय, ‘या वयात नाटक करणं लाजिरवाणं आहे.. जा थोडे पैसे कमव आणि मन:शांती मिळव.’ या पोस्टसोबतच तिने एक इमोजी जोडला आहे. पण ती नेमकं कोणाबद्दल किंवा कशाबद्दल बोलत आहे हे स्पष्ट केलं नाही. आणखी एका इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलं आहे, ‘ज्या आयुष्यासाठी तुम्ही एकेकाळी प्रार्थना केली होती, त्या आयुष्याने भारावून जाणं हे किती मोठं भाग्य आहे.’ विजय आणि संगीता यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर त्रिशाच्या या पोस्टनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

त्रिशाची पोस्ट-

संगीताने डिसेंबर 2025 मध्ये विजय यांच्याविरोधात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. त्यावेळी तिने विजय यांच्यावर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचाही आरोप केला होता. या आरोपांदरम्यान अभिनेत्री त्रिशा कृष्णन आणि थलपती विजय यांच्यातील मैत्रीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. काही महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये दोघांना एकत्रसुद्धा पाहिलं गेलं होतं. इतकंच नव्हे तर विजय यांच्या शपथविधी सोहळ्यातही त्रिशाचीच चर्चा होती.

विजय मुख्यमंत्री होताच त्यांच्या घटस्फोटाच्या आणि त्रिशा कृष्णनसोबतच्या नात्याबद्दल विविध चर्चा होऊ लागल्या. तेव्हापासून विजय यांची आई शोभा चंद्रशेखर यांनी पुढाकार घेतला आणि सून संगीताशी संवाद साधायला सुरुवात केली. घटस्फोटाची याचिका दाखल केल्यापासून परदेशात राहायला गेलेली संगीता गेल्या महिन्यातच तमिळनाडूमध्ये परतली आहे. त्यानंतर शोभा आणि संगीता यांच्यात बंद दाराआड चर्चासुद्धा झाल्याचं कळतंय. अखेर संगीताने घटस्फोट मागे घेण्याचा निर्णय घेतला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in