• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्…

August 8, 2026 by admin Leave a Comment


तिसऱ्या मुंबईच्या नियोजित विकासासाठी राज्य सरकारने 324 चौरस किलोमीटर क्षेत्राचा सर्वसमावेशक मास्टर प्लॅन निश्चित केला आहे. या प्रकल्पामुळे रायगड-पेण परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. यासाठी सिंगापूरस्थित मॅपलट्री कंपनी रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये सुमारे 1.9 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत MMRDA, टेमासेक सुरबाना ज्युराँग आणि मॅपलट्री यांच्यात सामंजस्य करार झाला. यापूर्वी जानेवारीमध्ये स्वित्झर्लंडमधील दाव्होस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान सुरबाना ज्युराँग आणि MMRDA यांच्यात प्राथमिक पातळीवर सामंजस्य करार झाला होता.

दरम्यान, रायगड पेण ग्रोथ सेंटर लिमिटेड आणि मॅपलट्री यांच्यात 100 एकरांच्या मिक्स-युज विकास प्रकल्पासाठीही करार करण्यात आला आहे. या प्रकल्पात मॅपलट्रीकडून भांडवली गुंतवणूक आणि मूल्यनिर्मिती केली जाणार आहे. जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न होणार आहेत. तसेच कंपनीने सुरबाना ज्युराँग यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.

या माध्यमातून पेण परिसरात नवीन उद्योग आणि व्यावसायिक संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. प्रस्तावित विकासामुळे पायाभूत सुविधा, रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदा होण्याची शक्यता आहे. मोठ्या गुंतवणुकीमुळे या भागाचे महत्त्व वाढणार असून, नियोजित विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in