• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Thalapathy Vijay : ज्याची भीती होती तेच घडलं, हाय कोर्टाचा थलपती विजय यांना सर्वात मोठा धक्का, तामिळनाडूमधून मोठी बातमी

July 27, 2026 by admin Leave a Comment


दोन महिन्यांपूर्वी तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली, या निवडणुकीमध्ये थलपती विजय यांच्या टीव्हीकेला मोठं यश मिळालं. डीएमके आणि एडिएमके सारख्या प्रस्थापित पक्षांना टीव्हीके सारख्या नव्या पक्षाने जोरदार झटका दिला. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेला सर्वाधिक 107 जागा मिळाल्या, मात्र तरी देखील टीव्हीकेला पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं, त्यामुळे राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी थलपती विजय यांना तारेवरची कसरत करावी लागली. टीव्हीकेनं राज्यात काँग्रेस आणि इतर छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळून सत्ता स्थापन केली. थलपती विजय यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. परंतु आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मद्रास हाय कोर्टाने थलपती विजय यांना मोठा झटका दिला आहे.

तामिळनाडूमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली होती, या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला होता, त्या मृतांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय थलपती विजय यांच्या सरकारने घेतला होता, मात्र आता हा निर्णय मद्रास हाय कोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. हा निर्णय तामिळनाडू सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तसेच ज्या कुटुंबाला यापूर्वीच सरकारी नोकरी देण्यात आली होती, त्याला देखील हाय कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

27 सप्टेंबर 2025 रोजी थलपती विजय यांनी एका रॅलीचं आयोजन केलं होतं, या रॅलीला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली, या गर्दीमध्ये चेंगरा चेंगरीची घटना घडली होती. या घटनते जवळपास 41 लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे, अशा कुटुंबातील लोकांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय टीव्हीके सरकारकडून घेण्यात आला होता, मात्र आता हा निर्णय मद्रास हाय कोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे, तसेच ज्यांना आधी नोकरी देण्यात आल्या आहेत, त्याला देखील हाय कोर्टाने स्थगिती दिली आहे. 10 जुलै रोजी या अपघातात मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबीयातील व्यक्तींना टीव्हीके सरकारकडून कायमस्वरुपी नोकरीचं प्रमाणपत्र देण्यात आलं होतं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ
  • Uric Acid problem: सांधेदुखीला कारण नॉनव्हेज?, रेड मीटने युरिक एसिडची पातळी वाढते, जाणून घ्या…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in