• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Thailand : अमेरिका सोडा, थायलंड सारख्या छोट्या देशाने भारताला दिला झटका, आपली श्रेणी बदलून थेट..

May 24, 2026 by admin Leave a Comment


भारतीयांचं परदेश भ्रमंतीचं प्रमाण मोठं आहे. या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अनेक भारतीय परदेशात फिरायला जातात. यात भारतातून थायलंडला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या सुद्धा मोठी आहे. भारतीयांची थायलंडला नेहमीच पसंती राहिली आहे. भारतीय पर्यटकांचा येणारा ओघ लक्षात घेऊन थायलंडने सुद्धा काही सवलती दिल्या होत्या. पण त्याच थायलंडने आता भारतीयांना सर्वात मोठा झटका दिला आहे. थायलंडमध्य भारतीयांना वीजा फ्री एन्ट्री होती. पण थायलंडने आपल्या नियमात महत्वाचा बदल केला आहे. थायलंडने भारताला वीज फ्री देशांच्या यादीतून हटवलं आहे. म्हणजे यापुढे थायलंड फिरायला जाताना वीजा घेणं बंधनकारक असेल. भारतीय पर्यटक वर्ष 2024 पासून सवलतीचा मोठ्या प्रमाणात फायदा उचलत होते. पण आता ही सुविधा आपल्यासाठी बंद होणार आहे.

19 मे रोजी थायलंडच्या मंत्रिमंडळाने नियमात बदल केला. त्यानुसार थायलंडने भारताला वीजा फ्री देशांच्या यादीतून हटवलं आहे. वीजा ऑन अरायवलच्या श्रेणीत टाकलं आहे. थायलंड आपली 60 दिवसांची वीजा फ्री पॉलिसी बंद करत आहे. करोना संकटानंतर देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी थायलंड सरकारने हा निर्णय घेतला होता. थायलंड कॅबिनेटने वीजा सवलत आणि VOA स्कीममध्ये संशोधनाला मंजुरी दिली आहे. सर्व 93 देशांसाठी 60 दिवसांची वीजा सवलत योजना रद्द होणार आहे. थायलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुद्धा त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

कुठल्या देशाच्या नागरिकांना वीजा फ्री एन्ट्री असेल?

भारतासह चार देशांना VOA श्रेणीत ठेवण्यात आलं आहेत. भारताशिवाय अजरबैजान, बेलारूस आणि सर्बिया हे देश VOA श्रेणीत आहेत. थायलंडमध्ये परदेशी प्रवाशांसाठी वेगवेगळी कॅटेगरी आहे. संयुक्त राज्य अमेरिका, यूनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, जापान, सिंगापूर आणि काही यूरोपियन देशांना 30 दिवसांची वीजा फ्री एन्ट्री मिळेल. यात सेशेल्स, मालदीव आणि मॉरीशस या देशांना 15 दिवस वीजा फ्री एन्ट्री असेल. भारत आता वीजा फ्री देशांच्या यादीत नसेल.

थायलंडने हा निर्णय का घेतला?

परदेशी नागरिकांची बेकायद कामं, गुन्हेगारी यामुळे थायलंडने हा निर्णय घेतल्याचं थाई अधिकाऱ्यांनी सांगितलं. थायलंडमध्ये अनेक परदेशी नागरिकांना अलीकडे अटक करण्यात आली होती. यात नशेशी संबंधित गुन्हे होते. सेक्स ट्रॅफिकिंग होतं. विनापरवानगी शाळा आणि हॉटेल चालवण्याचे प्रकार समोर आलेले. ज्या भारतीयांना यापुढे थायलंड फिरायला जायचं आहे, त्यांना ‘वीजा ऑन अरायवल’ व्यवस्थेअंतर्गत अर्ज करावा लागेल. थायलंडच्या ई-वीजा प्रणालीचा वापर करावा लागेल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार
  • मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in