• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Thackeray vs BJP : ठाकरेंना मर्सिडीज, BMW कोणी गिफ्ट केल्या ते आम्हाला माहितीय, त्यामुळे जनाब संजय राऊत तुम्ही..भाजपचा जोरदार पलटवार

July 29, 2026 by admin Leave a Comment


मुंबई महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी स्कॉर्पियो गाड्या घेतल्या होत्या. पण आता इनोव्हा गाड्या घ्यायचा प्रस्ताव आहे. यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान आपल्या ताफ्यामध्ये दहा-पंधरा बीएमडब्ल्यू, मर्सिडीज घेऊन फिरत असतील तर त्या रोगाची लागण खालच्या कार्यकर्त्यांना लागणारच ना. त्यावर आत भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “जनाब संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात किती BMW किती मर्सिडीज गाड्या आहेत हे एकदा महाराष्ट्राला सांगा. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात किती मर्सिडीज आहेत. आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यात किती बीएमडब्ल्यू आहेत हे एकदा महाराष्ट्राला सांगा. ते BMW, मर्सिडीजच्या खाली फिरत नाहीत” असा दावा भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला.

“उद्धव ठाकरे, जनाब संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करु नये. मूळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या ताफ्यात कुठल्या गाड्या होत्या?. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत, तरी त्यांच्या ताफ्यात मर्सिडीज, बीएमडब्ल्यू या गाड्या आहेत. आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातही त्याच गाड्या आहेत. संजय राऊत हे कुणाच्या पैशातून आलं?” असा सवाल भाजपने विचारला आहे.

याचं उत्तर जनाब संजय राऊत यांनी द्यावं

“मर्सिडीज, BMW तुम्हाला कोणी गिफ्ट दिल्या याची यादी आमच्याकडे आहे. संजय राऊत तुम्हाला कोणी गाड्या गिफ्ट केल्या हे सुद्धा सगळ्यांना माहित आहे. ज्यांनी इतरांकडून BMW, मसिर्डीज गिफ्ट घेतल्या, ज्यांच्या ताफ्यात फक्त याच गाड्या असतात. उद्धव ठाकरेंकडे कुठलं पद आहे, ते जे मर्सिडीज घेऊन फिरतात. याचं उत्तर जनाब संजय राऊत यांनी द्यावं” असं भाजपने म्हटलं आहे.

देवाभाऊंच्या ताफ्यात फक्त तीन ते चार गाड्या आहेत

“आदित्य ठाकरे कुणी गिफ्ट दिलेल्या मर्सिडीज, बीएमडब्ल्यू घेऊन फिरतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताफा कमी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला ताफा कमी केला. आता देवाभाऊंच्या ताफ्यात फक्त तीन ते चार गाड्या आहेत. त्यात मर्सिडीज, BMW या कार नसतात. संजय राऊत तुमच्या ताफ्यातील BMW, मर्सिडीज कार कोणी गिफ्ट दिल्या, त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या” अशी मागणी भाजपने केली.

आंब्यास दगड मारण्याची सवय सर्वांना असते

पेपर फुटी प्रकरणात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर भाजप प्रवक्ता उत्तर देताना म्हणाला की, “आंब्यास दगड मारण्याची सवय सर्वांना असते. जो व्यक्ती काम करु शकतो, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. देवेंद्र फडणवीस सक्षमपणे महाराष्ट्राला पुढे घेऊन जात आहेत. त्यांना कितीही घेरण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील 14 कोटी जनता त्यांच्या पाठिशी आहे. काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या पाठिशी कोणी नाही”

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Bigg Boss फेम भजन सम्राट वयाच्या 73 व्या वर्षी उरकणार चौथं लग्न? म्हणाले, ‘3 लग्न करण्यास मनाई नाही, पण बायका ठेवण्यास…’,
  • चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’
  • Marathi Language Row : रिक्षावाल्यांची इतकी मुजोरी, मुंबईत अचानक ऑटो-टॅक्सीचा इतका शॉर्टेज कसा झाला? कारण आलं समोर
  • IND vs SL: दुसरा दिवसाची शेवट वादग्रस्त, सामन्यात राडा, श्रीलंकन फलंदाजाने थेट ग्लोव्हज काढले अन्…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in