• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

TCS Nashik Nida Khan : लैंगिक त्रास दिला जातोय हे सांगूनही Action ने घेणारी ही TCS ची HR निदा खान कोण आहे?

April 16, 2026 by admin Leave a Comment


टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही देशातील नामांकीत आयटी कंपनी आहे. इथे महिला, मुलींचं लैंगिक शोषण, कामाच्या ठिकाणी गैरवर्तन आणि धर्मांतराचे प्रकार झाल्याचं समोर आहे. नाशिकच्या टीसीएसमध्ये हे सर्व घडलय. कॉर्पोरेट कल्चरमधली एक काळी बाजू समोर आली आहे. या प्रकाराने महाराष्ट्रच नाही, संबंध देश हादरला आहे. नाशिक टीसीएसमधील HR मॅनेजर निदा खानचं नाव या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून येत आहे. ती फरार असल्याची माहिती आहे. या प्रकरणात नाशिक पोलिसांकडून तपास सुरु आहे. आतापर्यंत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. महिलांना, मुलींना टार्गेट करण्याचा पॅटर्न काय होता? कुठल्या वयोगटातील मुली-महिला आरोपींच्या रडारवर असायचा, त्यावर कंपनीतीलच कर्मचाऱ्यांनीच प्रकाश टाकला आहे.

पोलीस निदा खानचा शोध घेत आहेत. कंपनीत एचआर म्हणून तिच्याकडे येणाऱ्या तक्रारी ती कशा प्रकारे हाताळायची या अँगलने पोलीस तपास करत आहेत. कंपनीतील अनेक महिला कर्मचाऱ्यांनी निदा खानवर तिने कुठलीही कारवाई केली नाही असा आरोप केला आहे. एचआर म्हणून कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या लैंगिक छळाच्या, गैरवर्तनाच्या तक्रारी तिच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. पण वारंवार तक्रारी करुनही एचआर म्हणून तिने कृती केली नाही, असं महिला कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. विषय वाढवू नये म्हणून मनोधैर्य खच्ची करण्याचे प्रकार व्हायचे असही काही तक्रारदाराचं म्हणणं आहे.

निदा खानचं शिक्षण कुठून झालय?

मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आमच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्याची दखल घेतली नाही असं तक्रारदाराचं म्हणणं आहे. निदा खान TCS नाशिक बीपीओ युनिटमध्ये एचआर मॅनेजर आहे. या प्रकरणाशी संबंधित वेगवेगळ्या FIR मध्ये ती आरोपी आहे. सध्या फरार आहे असं पोलिसांनी सांगितलं. लैंगिक छळ रोखणाऱ्या कंपनीतील पॉश समितीमध्ये ती होती. पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून तिने पदवी घेतली आहे. नाशिक टीसीएस केंद्रात कर्मचाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेणं आणि कामाच्या ठिकाणी नियमांच पालन होईल हे पाहणं ही तिच्यावर जबाबदारी होती.

हे प्रकरण बाहेर कसं आलं?

लग्नाचं आश्वासन देऊन रिलेशनशिप ठेवली अशी एका महिलेने सहकाऱ्याविरोधात तक्रार केली. तपासात प्रगती झाल्यानंतर अजून अनेक महिला समोर आल्या, त्यांनी कंपनीतील सहकाऱ्यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला. फेब्रुवारी 2022 ते मार्च 2026 दरम्यान या सर्व घटना घडल्या. अयोग्य पद्धतीने स्पर्श, आक्षेपार्ह टोमणे, पाठलाग आणि अन्य प्रकारच्या छळाच्या तक्रारी करण्यात आल्या.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sadabhau Khot : शरद पवार यांचं कुटुंब हे कधीच…सदाभाऊ खोत यांचे जिव्हारी लागणारे शब्द
  • एसी सुरु करून बाळाला झोपवताय? या चुका केल्यास बाळ पडू शकते आजारी
  • 6 मिनिट 51 सेकंदाचे ते रोमँटिक गाणे, ऐकून पहिल्या प्रेमाची येईल आठवण, 53 वर्षांनंतरही होतय ट्रेंड
  • पुढील 24-48 तास धोक्याची, भारताची धाकधुक वाढली, थेट 15 जहाजे..
  • CSK IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला मोठा झटका, भरवशाचा स्टार बॉलर संपूर्ण सीजनसाठी OUT

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in