• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CSK IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला मोठा झटका, भरवशाचा स्टार बॉलर संपूर्ण सीजनसाठी OUT

April 16, 2026 by admin Leave a Comment

IPL 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा अजून एक खेळाडू टुर्नामेंटमधून आऊट झालाय. त्यांचं बाहेर होणं हा सीएसकेसाठी मोठा झटका आहे. खराब सुरुवातीनंतर चेन्नई सुपर किंग्सची टीम रुळावर येत होती. त्यांनी मागचे दोन सामने जिंकले होते. आता वेगवान गोलंदाज खलील अहमदच्या मागे दुखापतींचं शुक्लकाष्ट लागलं आहे. तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. खलील अहमदचं संपूर्ण सीजनसाठी बाहेर होणं हा सीएसकेसाठी मोठा झटका आहे. आता वेगवान गोलंदाजीच्या आघाडीवर चेन्नईच्या टीमसमोर संकट निर्माण झालं आहे.

खलील अहमदला क्वाड्रीसेप्स इंजरी झाली आहे. त्यामुळे तो IPL 2026 मधून बाहेर गेलाय. कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात चौथी ओव्हर टाकताना खलील अहमदला ही दुखापत झाली. त्याला हिपमध्ये वेदना जाणवत होत्या. त्यामुळे तो त्याची ओव्हर पूर्ण करु शकला नाही. मिडिया रिपोर्टनुसार खलील अहमदला ग्रेड 2 इंजरी झाली आहे. यातून रिकव्हर होण्यासाठी त्याला 10 ते 12 आठवडे म्हणजे पुढचे तीन महिने रिहॅबमध्ये काढावे लागणार आहेत.

त्याची जागा कोण भरून काढणार?

IPL 2026 मध्ये CSK ची टीम आतापर्यंत पाच सामने खेळली आहे. खलील अहमद या सर्व सामन्यात टीमचा भाग होता. त्याने 5 सामन्यात 73 च्या सरासरीने 2 विकेट काढले. या दरम्यान त्याची इकॉनमी 8.67 होती. खलील अहमदला चेन्नई सुपर किंग्सने IPL 2026 च्या ऑक्शनमध्ये 4.8 कोटी मोजून रिटेन केलं होतं. त्याच्या अनुपस्थितीत CSK च्या वेगवान गोलंदाजीची मदार आता गुरजपनीत सिंह, अंशुल कंबोज आणि जॅमी ओवर्टन यांच्या खांद्यावर असेल.

CSK ची पुढची मॅच कोणाविरुद्ध?

IPL 2026 मधून बाहेर होणारा खलील अहमद CSK चा पहिला गोलंदाज नाहीय. नाथन एलिसही इंजरीमुळे या सीजनमध्ये खेळू शकला नाही. मॅट हेनरीचा आपल्या फॉर्मसाठी संघर्ष सुरु आहे. स्पेंसर जॉनसन अजून टीममध्ये दाखल झालेला नाही. सीएसकेकडे मुकेश चौधरी आणि रामकृष्ण घोष सारखे अनकॅप्ड गोलंदाज आहेत, जे मैदानावर खलीलची जागा घेऊ शकतात. CSK चा पुढचा सामना SRH विरुद्ध 18 एप्रिलला हैदराबाद मध्ये आहे.

 

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयाच्या दिवशी चुकूनही ‘या’ गोष्टी खरेदी करू नये नाहीतर..
  • वैशाख अमावस्येला पूर्वजांच्या शांतीसाठी करा ‘हे’ 5 उपाय, पिटृदोष होईल दूर..
  • तिने बाळाला थप्पड मारली अन्..; सोनाली कुलकर्णीने सांगितला धक्कादायक अनुभव
  • Nashik IT company : HR हेड चा किती होता पगार, निदा खानच्या अकाऊंटमध्ये आणखी कुठून यायचा पैसा ?
  • इराण अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी, थेट तेहरानहून अमेरिकेला जाणार..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in