• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Nashik IT company : HR हेड चा किती होता पगार, निदा खानच्या अकाऊंटमध्ये आणखी कुठून यायचा पैसा ?

April 16, 2026 by admin Leave a Comment


नाशिकमधील टीसीएस कंपनीत कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ आणि त्यांचं धर्मांतर करण्याच्या प्रकरणाने एक नवं वळण घेतलं आहे. हा संपूर्ण ‘खेळ’ बाहेरच्या लोकांकडूनच रचला जात होता का, या अनुषंगानेही सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी, पोलिसांनी आता अटक केलेल्या सर्व आरोपींच्या बँक खात्यांची तपासणी सुरू केली आहे. हे कर्मचारी केवळ टीसीएसकडून पगार घेत होते की त्यांना इतर स्त्रोतांकडून अतिरिक्त निधी मिळत होता, याचाही तपास केला जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या आरोपींना अटक केली आहे, त्यांच्या बँक खात्यांचा संपूर्ण तपशील बँकांकडून मागवण्यात आला आहे. त्यांचे पगार, ट्रॅन्झॅक्शन हिस्टरी आणि बाहेरील स्रोतांकडून पाठवलेल्या रकमेची तपासणी केली जात आहे. आरोपींना इतर ठिकाणाहून निधी मिळत होता का आणि त्याचा उपयोग ऑफीसमधील त्यांच्या कामांसाठी केला जात होता का, याचाही तपास यंत्रणांकडून तपास सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या केसमधील तपासाची व्याप्ती केवळ एक किंवा दोन व्यक्तींपुरती मर्यादित नाही. सर्व टीम लीडर्स आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यांची बारकाईने तपासणी केली जात आहे. या तपासात एचआर निदा खान, ही सर्वात महत्त्वाचा दुवा मानली जात आहे, कारण ती केवळ एचआरच्या भूमिकेत नव्हती, तर तिने संपूर्ण नेटवर्कमध्ये सक्रिय भूमिका बजावली होती, असा आरोप आहे.

SIT तपासात नवा अँगल

या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी एक विशेष तपास पथक (SIT) आधीच स्थापन करण्यात आले आहे. तक्रारींची पडताळणी करणे आणि आरोपींची भूमिका निश्चित करण्यावर सुरूवातीला एसआयटीचे लक्ष होतं, पण आता तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण केवळ वैयक्तिक पातळीवरचे होते की यामागे एखादे संघटित नेटवर्क कार्यरत होते, हे समजून घेण्याचा एसआयटी आता प्रयत्न करत आहे. या संदर्भात, बँक खात्यांची तपासणी ही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या कर्माचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त इतर स्त्रोतांकडून निधी येत असल्याचा पुरावा आढळल्यास, हे प्रकरण अधिक गंभीर होऊ शकते असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.

निदा खान अजूनही फरार

कंपनीतील एचआर निदा खान हिचं नाव एफआयारमध्ये सुरूवातीपासूनच समोर येत आहे. महिला कर्मचाऱ्यांचा छळ केल्याचा आणि त्यांना धर्मांतरित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या टीम लीडर्सना निदा खान हिने पाठिंबा दिल्याचा तिच्यावर आरोप आहे. आता तिच्या बँक अकाऊंट्सची देखील चौकशी सुरू झाल्याने, तिची भूमिका अधिकच महत्त्वाची झाली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, निदा खान अजूनही फरार असून तिचा शोध सुरू आहे. तिच्या अटकेमुळे अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील.

पोलिसांनी आतापर्यंतटाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या सात कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. यामध्ये सहा पुरुष आणि एका महिला ऑपरेशन्स मॅनेजरचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये दानिश शेख, तौसीफ अत्तार, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख आणि आसिफ आफताब अन्सारी यांचा समावेश आहे. या सर्वांवर महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ, धार्मिक दबाव आणि सक्तीच्या धर्मांतराचा प्रयत्न यांसारखे गंभीर आरोप आहेत. या सर्वांना कंपनीनेन निलंबित केल्याची माहिती समोर येत आहे.

महिला कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यावर हे संपूर्ण प्रकरण सुरू झालं होतं. एकूण आठ महिला कर्मचाऱ्यांनी मानसिक आणि लैंगिक छळाचा आरोप केला होता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आलं. हे प्रकरण एचआर विभागापर्यंत पोहोचूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, असाही आरोप आहे. त्यामुळे एचआरच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलं आहे.

निदाकडून साथीदारांचा बचाव

या संपूर्ण प्रकरणात एचआरच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. एका महिला अधिकाऱ्याने ‘अशा गोष्टी घडत असतात’ असे सांगून पीडितेला तक्रार दाखल करण्यापासून परावृत्त केलं होतं असं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नमूद केलं. आणि याच वृत्तीमुळे अनेक प्रकरणांमध्ये कारवाई झाली नाही. तपासात असेही उघड झाले की, आरोपीने एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता, ज्याद्वारे कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले जात होते. पीडितांचा दावा आहे की, निदा खान देखील या ग्रुपची सदस्य होती. एफआयआरमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार, काही प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्यांना नमाज पढण्यास, मांसाहारी भोजन करण्यास आणि धार्मिक चिन्हे धारण करण्यास भाग पाडलं गेलं. एका पीडितेने असाही आरोप केला की तिला डोक्यावर टोपी घालून प्रार्थना करण्यास भाग पाडलं आणि तिचा फोटाही काढण्यात आला. कर्मचाऱ्यांविरुद्ध लैंगिक छळाचे अनेक गंभीर आरोप समोर आले आहेत, ज्यात विनयभंग, अश्लील टिप्पणी, धमकावण्याचे प्रयत्न आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल टिप्पणी यांचा समावेश आहे. या केसची अतिशय कसून चौकशी व तपास सुरू आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Shweta Tiwari : लाल साडी, मोकळे सोडलेले केस.. वयाच्या पंचेचाळीशीत श्वेता तिवारीच्या वेड लावणाऱ्या मनमोहक अदा
  • Trains Colours: भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
  • तुळशी जवळ चुकूनही लावू नका हे रोप? आयुष्यात येईल दारिद्र्य
  • पुण्यात अंगावर शहारे आणणारा अघोरी प्रकार! भूत आणि करणीच्या नावाखाली थेट… धक्कादायक घटनेने सुसंस्कृत शहरात खळबळ
  • SGB मधून 5 वर्षात 302% नफा! गुंतवणूकदारांची चांदी, RBI ने जाहीर केली पैसे काढण्याची तारीख

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in