• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पुण्यात अंगावर शहारे आणणारा अघोरी प्रकार! भूत आणि करणीच्या नावाखाली थेट… धक्कादायक घटनेने सुसंस्कृत शहरात खळबळ

April 16, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून राज्याच अघोरी कृत्य करत असलेल्या भोंदूबाबांना अटक करण्यात आली आहे. नाशिकमधील लिंगपिसाट अशोक खरात प्रकरण समोर येताच राज्यात खळबळ माजली. त्यानंतर ठिकठिकाणी भोंदूबाबांविरोधात अॅक्शन घेण्यात आली. आता असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘जागरण’च्या निमित्ताने घरात ‘चेडा’ (भूत) आणला आहे, तो कुटुंबाचा भाग बनवायचा आहे अशा भयानक आणि प्रक्षोभक विधानांनी एका कुटुंबाला मानसिक त्रास देणाऱ्या दोन भोंदू भगतांचा कट उघडकीस आला आहे. ही घटना खेड तालुक्यातील मंदोशी आणि राजपूर येथे घडली असून, तिने संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली आहे.

किसन तळपे आणि मंगेश कारोटे या दोन कथित भगतांवर पुराव्यासह पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ऑडिओ रेकॉर्डिंग आणि उपलब्ध पुराव्यांनुसार, या दोघांनी संगनमताने एका कुटुंबात फूट पाडण्याचा आणि त्यांना मानसिक गुलाम बनवण्याचा अघोरी प्रयत्न केला.

धक्कादायक दावे आणि भीतीदायक विधाने

तक्रारीनुसार, जागरणासाठी बोलावणी करणाऱ्या व्यक्तीच्या घरासमोर थडगे असल्याचे सांगून भगतांनी भीती घातली. त्यांनी दावा केला की, “घरात बाहेरचा ‘चेडा’ आणून ठेवला आहे. त्याला कुटुंबाचा भाग बनवण्यासाठी विशेष विधी करावे लागतील.” जागरणाच्या बहाण्याने त्यांनी संपूर्ण भावकी (कुटुंबीय) कडून तांदूळ गोळा केले आणि त्याचा नैवेद्य दाखवून आणलेल्या भुताला प्रसन्न करण्याचा नाटक केले. याशिवाय त्यांनी “एकाची पोळी भाजली जाईल, तर बाकीच्यांची करपून जाईल” असे भयावह वाक्य उच्चारले.

तसेच, “पोरांना पुढे केले आणि चोरांना मागे ठेवले” अशा अपमानजनक शब्दांत कुटुंबातील सदस्यांचा अपमानही केला. या संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पीडित कुटुंबाची मोठी बदनामी झाली.

दोघांचे संगनमत

किसन तळपे (मंदोशी) आणि मंगेश कारोटे (राजपूर) या दोघांनी एकमेकांकडे बोट दाखवत आणि ‘उजवा-डावा प्रसाद’, ‘तांबड्या अंगाऱ्याचे’ नाटक करून दैवी शक्तीचा खोटा देखावा निर्माण केला. यामुळे पीडित व्यक्तीचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला गेला.

कायदेशीर कारवाईची मागणी

या प्रकारामुळे पीडित कुटुंब प्रचंड मानसिक तणाव आणि दहशतीखाली आहे. त्यांनी प्रशासनाकडे, महाराष्ट्र अनिष्ट प्रथा व जादूटोणा विरोधी कायदा २०१३ अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल करावा, महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा २०१७ अंतर्गत कारवाई करावी, सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याप्रकरणी सायबर गुन्ह्यांतर्गत तपास करावा आणि
या दोघांना कोणी भाग पाडले किंवा त्यांचा ‘बोलावता धनी’ कोण आहे, याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

परिसरात खळबळ

ही घटना उघडकीस आल्यानंतर खेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा भोंदू भगतांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. लोकांना सांगण्यात आले आहे की, भूत, करणी, थडगे किंवा अघोरी विधींच्या नावाखाली पैसे किंवा विश्वास घेणाऱ्या व्यक्तींना लगेच पोलिसांकडे किंवा प्रशासनाकडे तक्रार करावी.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आयपीएलमधील तीन संघांना झालं 60 कोटींचं नुकसान! कोट्यवधींची रक्कम मोजून पश्चातापाची वेळ
  • जास्त पाणी असलेला नारळ कसा ओळखायचा? नारळ विक्रेत्याने सांगितले गुपित, तुमचे पैसे होतील वसूल
  • Share Market: 11 दिवसांपासून तुफान काही सरेच ना! हा शेअर ऑल टाईम हायवर
  • आज ही चूक करू नका, अन्यथा…मोदींचा विरोधकांना खोचक सल्ला; लोकसभेत काय घडलं?
  • US-Iran Talk : अमेरिकेसोबत शांतता वाटाघाटीआधीच इराण झुकला, स्ट्रेट ऑफ हॉर्मुजवर आली मोठी Good News

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in