• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जास्त पाणी असलेला नारळ कसा ओळखायचा? नारळ विक्रेत्याने सांगितले गुपित, तुमचे पैसे होतील वसूल

April 16, 2026 by admin Leave a Comment


उन्हाळ्याच्या दिवसात नारळ पाणी प्यायल्याने शरीराला थंडावा आणि ऊर्जा मिळते. पण बऱ्याचदा आपण बाजारात जाऊन मोठा नारळ विकत घेतो आणि घरी फोडल्यावर त्यात खूप कमी पाणी निघते, असे झाल्यावर आपला हिरमोड होतो.

coconut water (1)

पण आता काळजी करू नका. एका अनुभवी नारळ विक्रेत्याने नारळात पाणी जास्त आहे की नाही, हे ओळखण्याचे काही सोपे मार्ग सांगितले आहेत. याचा अवलंब करुन तुम्ही नारळात पाणी जास्त आहे की नाही, हे ओळखू शकता.

coconut water (4)

नारळ खरेदी करताना साधारण ५ गोष्टींकडे लक्ष देणे फार गरजेचे असते. ज्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही. अनेकांना वाटते की मोठा नारळ म्हणजे जास्त पाणी. पण हे चुकीचे आहे. मोठ्या नारळात अनेकदा मलई जास्त असते आणि पाणी कमी असते. त्यामुळे नेहमी मध्यम आकाराचा नारळ निवडा.

coconut water (3)

नारळ कानाजवळ धरून हलवून पहा. जर त्यातून पाण्याचा खूप मोठा आवाज येत असेल, तर तो नारळ घेऊ नका. त्या नारळात पाणी कमी आणि हवा जास्त आहे. जर नारळ हलवताना आवाज येत नसेल किंवा खूप कमी आवाज येत असेल, तर तो नारळ पाण्याने पूर्ण भरलेला आहे असे समजावे.

coconut water (2)

नारळ पाणी घेण्यापूर्वी त्याचा आकार बघणे खूप महत्त्वाचे आहे. जर नारळ वरून त्रिकोणी दिसत असेल, तर तो आतून पोकळ असण्याची शक्यता असते. त्याऐवजी गोल किंवा अंडाकृती आकाराचे नारळ घ्यावेत. त्यात पाणी जास्त असते.

coconut water (6)

बाजारात दोन नारळ सारख्या आकाराचे दिसत असतील, तर ते हातात घेऊन वजन तपासा. जो नारळ वजनाला जास्त जड वाटेल, तोच निवडा. वजन जास्त असणे हे नारळ पाण्याने भरलेले असल्याचे संकेत असतात.

coconut water (5)

नारळाच्या वरच्या टोकाला जिथे देठ असतो तिथे बघा. जर तिथे खोल खड्डा असेल आणि आजूबाजूला हिरवा रंग असेल, तर तो नारळ ताजा आहे. मात्र, जर तिथे काळे डाग किंवा छिद्र दिसत असेल, तर तो नारळ आतून खराब किंवा सडलेला असू शकतो.

coconut water 8

त्यामुळे पुढच्या वेळी नारळ विकत घेताना व्यापाऱ्याने दिलेल्या या सोप्या टिप्स नक्की वापरून पहा. यामुळे तुमचे पैसे सार्थकी लागतील. तुम्हाला तहान भागवण्यासाठी पुरेसे नारळ पाणी मिळेल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चार चिमुकल्यांवर काळाचा घाला, शाळेतून येताना खड्ड्यात बुडून मृत्यू
  • मोठी बातमी! भारताचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, थेट रशियासोबत मिळून समुद्रात मोठा खेळ, अमेरिकेत उडाली खळबळ
  • Arvind Sawant | Women’s Reservation Bill | नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
  • MI vs PBKS Live Updates, IPL 2026: मुंबई वानखेडेत दुसऱ्या विजयासाठी सज्ज, पंजाबला रोखणार?
  • LPG पुरवठा सुरळीत होण्यासाठी इतकी वर्षे लागतील, सरकारी अधिकाऱ्याचा दाव्याने वाढले टेन्शन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in