• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तिने बाळाला थप्पड मारली अन्..; सोनाली कुलकर्णीने सांगितला धक्कादायक अनुभव

April 16, 2026 by admin Leave a Comment


लहान बाळ रडत असलं की त्याला शांत करण्यासाठी आईवडिलांकडून विविध उपाय केले जातात. परंतु अशा वेळी काहींचा संयमही सुटतो. सतत रडत असलेल्या बाळाला आई किंवा वडिलांनी मारल्याच्या अनेक घटना आपण आजूबाजूला पाहत असतो. परंतु सार्वजनिक ठिकाणी जर बाळ रडत असेल तर त्याला लज्जास्पद समजू नका, असा महत्त्वाचा सल्ला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पालकांना दिला आहे. सोनालीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत यासंदर्भातला एक प्रसंग सांगितला आहे. विमानातून प्रवास करताना एक लहान बाळ प्रचंड रडत होतं, म्हणून त्याला गप्प करण्यासाठी त्याच्या आईने काय केलं, याबद्दल सोनालीने सांगितलं.

‘आपली मुलं ही इतरांसाठी केवळ लज्जास्पदच आहेत, असं गृहीत धरू नका. मुलांचं शरीर वेगळं असतं, त्यांच्या वेदनाही स्वत:च्या वेगळ्या असतात. प्रौढ व्यक्ती म्हणून त्यांचं रक्षण करणं आणि त्यांना दिलासा देणं ही आपली जबाबदारी नाही का? त्या मुलाच्या गरजांपेक्षा आपल्या स्वत:च्या प्रतिमेची काळजी करणं इतकं महत्त्वाचं आहे का’, असा सवाल करत सोनालीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonali Kulkarni (@sonalikul)

काय म्हणाली सोनाली?

“विमानात एक-सव्वा वर्षाचं बाळ होतं. त्या बाळाच्या आईवडिलांनी त्याला दोन सीट्सच्या मधे बेल्ट लावून बसवलं होतं. ते बाळ इतकं रडत होतं आणि मला असं वाटतं की त्या बाळाचे कान दुखत होते. मी मागे वळून त्यांना विचारलं की काही मदत हवी का? मी बाळाला थोडा वेळ कडेवर घेऊ का? त्या बाळाच्या आईला वरमल्यासारखं झालं आणि ती म्हणाली.. नाही नाही, ठीक आहे. मी त्यांना म्हटलं की तुम्ही बाळाला कडेवर घ्या, जवळ तरी घ्या. मग त्या बाईने तिच्या बाळाला कडेवर घेतलं. पण तरीही ते शांत न झाल्याने तिने जवळजवळ त्याला एक थप्पड मारली आणि त्याला दाबायचा प्रयत्न केला. यात लाज वाटण्याची काहीच गोष्ट नाही. लहान मुलांना काही त्रास असतो आणि ते शब्दांत व्यक्त करू शकत नाहीत. विमानात कधीकधी कान दुखतो ना, होत असेल त्या बाळाला काही त्रास, आपण मदत मागायला पाहिजे. बाळाला त्रास देऊन किंवा शिक्षा देऊन काय उपयोग आहे,” असा प्रश्न सोनालीने विचारला आहे.

सोनालीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी नंबर 1 होणार की नाही? 19 एप्रिलला लागणार निकाल
  • Shweta Tiwari : लाल साडी, मोकळे सोडलेले केस.. वयाच्या पंचेचाळीशीत श्वेता तिवारीच्या वेड लावणाऱ्या मनमोहक अदा
  • Trains Colours: भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
  • तुळशी जवळ चुकूनही लावू नका हे रोप? आयुष्यात येईल दारिद्र्य
  • पुण्यात अंगावर शहारे आणणारा अघोरी प्रकार! भूत आणि करणीच्या नावाखाली थेट… धक्कादायक घटनेने सुसंस्कृत शहरात खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in