• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एसी सुरु करून बाळाला झोपवताय? या चुका केल्यास बाळ पडू शकते आजारी

April 16, 2026 by admin Leave a Comment


सध्या राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळ लहान मुलांसह मोठ्यांच्याही अंगाची लाही लाही होताना दिसते. उन्हाळ्याच्या कडक तडाख्यामुळे नवजात बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे पालकांसाठी एक मोठे आव्हान ठरत आहे.

born-baby-Sleep-in-AC-1

उकाड्यामुळे बाळाला रात्रीची शांत झोप लागत नाही, अशा वेळी एसी (AC) वापरणे हा एक सोपा मार्ग वाटतो. मात्र, एसीमध्ये बाळाला झोपवणे सुरक्षित आहे का? असा प्रश्न अनेकदा पालकांना पडतो. तज्ज्ञांच्या मते, योग्य खबरदारी घेतल्यास एसीचा वापर बाळासाठी फायदेशीर ठरू शकतो.

born-baby-Sleep-in-AC-4

बालरोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार बाळाच्या खोलीचे तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस दरम्यान ठेवणे सर्वात सुरक्षित मानले जाते. हे तापमान बाळाला उकाड्यापासून आराम देते आणि त्यांना जास्त थंडीही वाजत नाही.

born-baby-Sleep-in-AC-5

एसीची थंड हवा थेट बाळाच्या अंगावर येणार नाही, याची काळजी घ्या. यामुळे बाळाला सर्दी किंवा फ्लूचा त्रास होऊ शकतो. एसी सुरू असताना बाळाला पूर्ण स्लीव्हचे सुती कपडे घालावेत. तसेच झोपताना त्यांना हलकी टोपी घातल्यास शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.

born-baby-Sleep-in-AC-3

पालकांनी बाळाचे हात आणि पाय अधूनमधून तपासावेत. जर ते अतिशय थंड वाटत असतील, तर एसीची स्पीड कमी करा किंवा तो बंद करा. उन्हाळ्यात उष्णतेमुळे बाळाला होणारा त्रास टाळण्यासाठी एसीचा वापर करणे चुकीचे नाही.

born-baby-Sleep-in-AC-2

मात्र, अतिथंड तापमान किंवा थेट थंड हवा टाळल्यास तुमचे बाळ सुरक्षित आणि शांत झोप घेऊ शकते. उन्हाळ्याच्या दिवसात बाळाच्या आरोग्याबाबत कोणतीही शंका असल्यास आपल्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही योग्य ठरेल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नारी शक्ती विधेयकावर वादळी चर्चा, अरविंद सावंत आक्रमक, संसदेत नेमकं काय घडलं?
  • IPL 2026 स्पर्धेत आरसीबी नवा इतिहास रचण्याच्या वेशीवर, असं करताच 14 वर्षे जुना विक्रम मोडणार
  • नर्गिससोबत बोलायचं आहे… आतल्या खोलीत नेलं अन्… सोलापूर भयंकर घटनेनं हादरलं
  • जर तुम्ही दररोज हे 8 सुपरफूड्स खाल्ले तर रहाल स्लिम आणि फिट
  • घरच्या घरी सोप्या पद्धतीनं तूप कसं बनवायचं ? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in