
नवराबायकोच्या नात्यात कधी ना कधी, केव्हा ना केव्हा थोडी तरी कुरबूर होते. पण कुरबुर झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना समजून पुढे जायचं असतं. याचा अर्थ असा नाही की कुरबुर झाली म्हणजे एकमेकांच्या जीवावर उठावं. सोलापुरात एक अत्यंत भयानक प्रकार घडला. लग्नाला दोन तीन महिनेच झाले होते. त्यातच दोघांच्या कुरबुरी वाढल्या. त्या इतक्या टोकाला गेल्या की संतप्त नवऱ्याने पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरही याच घटनेवर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.
सोलापूर शहरातील लोकमान्य नगर परिसरातील ही घटना आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. फैजान जावेद शेख असं आरोपी पतीचे नाव आहे. तर नर्गिस शेख असे पीडीत पत्नीचे नाव आहे. सुदैवाने ही महिला वाचली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, ती गंभीर भाजली आहे.
पेट्रोल टाकून फरार
2024 साली नर्गिस आणि फैजान या दोघांचा विवाह झाला होता. मात्र लग्नाच्या अवघ्या 2-3 महिन्यातच दोघांमध्ये वाद होऊ लागल्याने दोघेही वेगळे राहत होते. तलाक देण्याच्या कारणावरून मागील काही दिवसापासून दोघांत सातत्याने वाद होत होते. काल बुधवारी रात्री 10 च्या दरम्यान आरोपी फैजान हा नर्गिसच्या घरी आला आणि पत्नी सोबत बोलायचे असल्याने सांगून तिला एका खोलीत नेले. तिथे दोघांमध्ये परत वाद झाला. त्यानंतर संतप्त आरोपीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि तिला लायटरने पेटवून देऊन फरार झाला.
घराग आग लागल्याची दिसली…
घरात आग लागल्याचे पाहून शेजारी धावत आले. त्यातच नर्गिसच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लोक धावत सुटले. शेजाऱ्यांना नर्गिसच जळत असल्याचे दिसली. त्यानंतर शेजारी आणि कुटुंबीयांना तात्काळ आग विझवली आणि कुटुंबियांनी नर्गिसला गंभीर अवस्थेत सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनेनंतर सोलापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच या घटनेचा पंचनामा केला असून गुन्हा दाखल केला आहे. नर्गिसचीही जबानी घेतली जाणार आहे.
आरोपीचा शोध सुरू
दरम्यान, आरोपी फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याने हा प्रकार का केला? दोघांमध्ये शेवटचा वाद कशावरून झाला? तो एकटाच होता की आणखी कोणी त्याच्यासोबत होते? आदी प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी असून पोलीस या प्रश्नांचा शोध घेत आहे.
Leave a Reply