
अक्षय तृतिया जवळ आली आहे. या सणामुळे सराफा बाजारात मोठी उलाढाल होताना पाहायला मिळत आहे. सोन्याचा भावही रोज कमी-जास्त होत आहे. आज पुन्हा एकदा सोन्याचा भाव वाढला आहे. सोन्यासह चांदीचा भावदेखील वाढला आहे. गेल्या वर्षभराचा विचार करायचा झाला तर सोन्याचा भाव चक्क 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे.
गेल्या वर्षभरात बऱ्याच घडामोडी घडल्या. रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध अमेरिकेचे टॅरिफ धोरण यामुळे वर्षभरात सोन्याचा भाव चांगलाच वाढल्याचे पाहायला मिळाले. आकडेवारीत सांगायचे झाले तर ही भाववाढ 50 टक्के आहे.
गेल्या 12 महिन्यात सोन्याचा भाव 50 टक्क्यांनी वाढला आहे. 30 एप्रिल 2025 रोजी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 99,500 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आता हाच भाव चक्क दीड लांखांच्याही पुढे गेला आहे.
आकडेवारीत सांगायचे झाल्यास 30 एप्रिल 2026 रोजीच्या भावाच्या तुलनेत आज सोन्याचा भाव तब्बल 57,755 रुपयांनी वाढला आहे. आज म्हणजेच 16 एप्रिल 2026 रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,57,255 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा आहे.
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)




Leave a Reply