
गेल्या 17 वर्षांपासून छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली आहे. या 17 वर्षांच्या दीर्घ प्रवासात अनेक कलाकारांनी शोला अलविदा केला, तर काही नवीन चेहऱ्यांनी आपली जागा निर्माण केली. पण एक गोष्ट आहे जी नेहमी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवून ठेवते, ती म्हणजे गोकुळधाम सोसायटी. हीच ती जागा आहे, जिथे जेठालाल, भिडे, पोपटलाल, अय्यर, डॉ. हाथी आणि इतर सर्व पात्रांच्या नवनवीन कहाण्या जन्म घेतात.
पण नुकताच समोर आलेल्या एका व्हिडिओने शोच्या फॅन्सची चिंता वाढवली आहे. व्हिडीओमध्ये गोकुलधाम सोसायटीच्या सेटवर मोठ्या प्रमाणात तोडफोड सुरू असल्याचे दिसत आहे. चारही बाजूला मजूर काम करताना दिसत आहेत आणि संपूर्ण सेट लाकडी खांब आणि फळ्यांनी झाकलेला आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर फॅन्स खूप चिंताग्रस्त झाले आणि प्रश्न विचारू लागले की, गोकुळधाम सोसायटी कायमची बंद होत आहे?
व्हिडीओ व्हायरल झाल्यावर फॅन्सनी वेगवेगळे अंदाज लावायला सुरुवात केली. कोणीतरी विचारले की सेट का तोडला जात आहे, शो बंद होणार आहे का? तर कुणीतरी म्हणाले की, आता गोकुळधामचा संपूर्ण सेट बदलणार आहे का?
फॅन्सच्या वाढत्या चिंतेमध्ये शोचे निर्माते असित कुमार मोदी स्वतः समोर आले आणि संपूर्ण सत्य सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, गोकुळधाम सोसायटी कायमची तोडली जात नाहीये, तर तिचे रिनोव्हेशन (नूतनीकरण) केले जात आहे.
व्हिडीओमध्ये असित मोदी म्हणतात, “बघा, जे काही होत आहे ते चांगल्यासाठी होत आहे. गोकुळधाम सोसायटीचे रिनोव्हेशन सुरू आहे. काही दिवसांनी तुम्ही याला पूर्णपणे नव्या अवतारात आणि नव्या रूपात पाहाल. देवाकडे प्रार्थना आहे की, गोकुळधामचा हा नवा लुक तुम्हाला नक्की आवडेल.
त्याच व्हिडिओमध्ये असित कुमार मोदी सोसायटीत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेताना दिसत आहेत. ते तिथे उपस्थित इंजिनिअर्स, सुपरवायझर आणि मजुरांशी बोलत आहेत आणि काम सुरक्षित पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देत आहेत.





Leave a Reply