• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कृती सेनॉनच्या तोकड्या कपड्यांचा वाद अखेर शमला, घेतला मोठा निर्णय

August 26, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री कृती सेनॉन गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात होती. त्यामागे कारण देखील तसं होतं. नुकताच कृती हिची एक जाहिरात प्रदर्शित झालेली. रक्षाबंधन निमित्ताने जाहिरात प्रदर्शित करण्यात आलेली. पण जाहिरातीत कृती हिने ज्या प्रकराचे कपडे घातले होते, त्यामुळे अनेकांनी अभिनेत्रीवर निशाणा साधला. नेटकऱ्यांपासून, भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांनी देखील अभिनेत्रीच्या कपड्यावर निशाणा साधला. पण आता घेतलेल्या एका निर्यणामुळे कृतीच्या कपड्यांवरचा वाद अखेर शमला आहे.

समोर येत असलेल्या माहितीनुसार कृती सेनॉन हिच्यावर चित्रीत वादात सापडलेली जाहिरात अखेर हटवण्यात आली आहे. जी जाहीरात रक्षाबंधन संधर्भात होती. जाहिरातीत अभिनेत्रीने घातलेल्या तोकड्या कपड्यांवरुन वाद सुरु झालेला. कंपनीने सांगितल्यानुसार, भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांबद्दल आमच्या मनात अत्यंत आदर आणि सन्मान आहे. एक ब्रँड म्हणून, आम्ही नेहमीच हे आनंदाचे क्षण संपूर्ण कुटुंबासोबत साजरे करण्यावर विश्वास ठेवला आहे आणि या वेळी आम्हाला हे प्रेम आणि उत्सव आमच्या पाळीव प्राण्यांपर्यंत पोहोचवायचं होतं.

जर आमच्या जाहिरातीमुळे समाजातील काही घटकांच्या भावना नकळतपणे दुखावल्या गेल्या असतील, तर तसा आमचा मुळीच हेतू नव्हता…आदर म्हणून, आम्ही सदर जाहिरात सर्व माध्यमांमधून मागे घेतली आहे. या सणासुदीच्या काळात तुम्हा सर्वांना प्रेम आणि सकारात्मकतेच्या हार्दिक शुभेच्छा!

सांगायचं झालं तर, जाहिरात वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर कंगना यांनी देखील वादात उडी घेतली आणि  म्हणाल्या, ‘महिला कोणत्याही प्रकारचे कपडे घालू शकतात. पण भावाला बिकिनी  घालून राखी कोण बांधतं…?’ असं त्या म्हणाल्या, त्यानंतर राहूल गांधी यांनी कृती हिचं समर्थन केलं.

इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत कंगना म्हणाल्या, ‘आजच्या दिवसांत महिला त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालू शकतात. त्यांच्याकडे अनेक पर्याय आहेत. वेस्टर्न ड्रेसपासून लेहेंगा, जीन्स, साडी, बिकीनी आणि सलवार – कुर्ती सर्वकाही आहे. इतके सारे पर्याय असताना, कोणती महिला भावाला बिकिनी घालून राखी का बांधेल?’, कंगना असं देखील म्हणाल्या.

 

 

 

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बॉबी देओलसोबत मराठमोळ्या अभिनेत्रीचे इंटिमेट सीन्स; म्हणाली ‘शूट करताना मर्यादा..’
  • जरांगे, हाकेंना आंदोलनाआधीच मोठा झटका? गृहविभागाचे तातडीचे आदेश; आता आझाद मैदानात…
  • तुमच्या फोन आणि सिम कार्डमध्ये सोने असते! ते काढून पैसे कमावता येतात का?
  • सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
  • Tukaram Mundhe: मुंढे इफेक्ट, दादरच्या प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याचे धाबे दणाणले, लगेच केला बदल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in