
T20 World Cup 2026: टी20 वर्ल्ड कप 2026 हा भारत आणि श्रीलंकेने आयोजित केला होता. या विश्वचषकात भारताने न्यूझीलंडला नमवत तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याचा विक्रम केला. पण आता या विश्वचषकात मॅच फिक्सिंग झाल्याचा मोठा दावा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सामना कोण जिंकणार हे अगोदरच निश्चित झाल्याचा आरोप करण्यात आल्याने क्रिकेट जगत हादरून गेले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) लाचलुचपत प्रतिबंध पथकाने (ACU)टी20 विश्वचषक 2026 च्या त्या सामन्याची चौकशी सुरू केली आहे. याच सामन्यात मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
T20 World Cup 2026 मध्ये फिक्सिंग?
ESPN Crickinfo च्या वृत्तानुसार, जागतिक क्रिकेट परिषदेच्या (ICC) अँटी करप्शन युनिटने कॅनाडा क्रिकेट संघाशी संबंधीत भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सुरू केली आहे. कॅनाडा आणि न्यूझीलंडचा सामना आयसीसीच्या रडारवर आला ाहे. न्यूझीलंडचा संघाने खेळलेले पाचवे षटक चर्चेत आहे. या सामन्यात कॅनडाचा कर्णधार दिलप्रीत बाजवा याने गोलंदाजी केली होती. या षटकात त्याने नो बॉल टाकला होता. लेग साईडला वाईड बॉल टाकला. या ओव्हरमधून 15 धावा भेटल्या. त्यापूर्वी कॅनडाचा पेसर जसरकरण सिंह आणि डिलोन हेलिगर यांच्या ओव्हर पण महागड्या ठरल्या. तर फिरकीपटू साद बिन जफर याने तिसरी ओव्हर मेडन टाकली होती.
the ‘Fifth Estate’ ची डॉक्युमेंट्री ‘Corruption, Crime and Cricket’ च्या ब्रॉडकास्ट झाला. कॅनडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (CBC) ने ही तो तयार केला. त्यात कॅनडा क्रिकेट बोर्डाच्या एकूणच कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. काही जुने कॉल रेकॉर्डवरून या फिक्सिंगचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती समोर येत आहे. या संघाचे कोच खुर्रम चौहान यांनी आपल्यावर काही खास खेळाडू संघात घेण्यासाठी मोठा दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर या प्रकरणाला मोठी हवा मिळाली आहे.
कॅनडा क्रिकेट जगतात हंगामा
या आरोपांनी आणि आयसीसीच्या चौकशी पथकामुळे कॅनडाच्या क्रिकेट जगतात एकच भूकंप झाला आहे. आयसीसीचे अधिकारी एंड्य्रू एफग्रेव यांनी ‘Corruption, Crime and Cricket’ या डॉक्युमेंट्रीची संपूर्ण माहिती असल्याचे मोठे विधान केले आहे. तर कॅनाडा क्रिकेटमध्ये गेल्या एक वर्षांपासून मोठी अस्थिरता दिसून आली आहे. माजी सीईओ सलमान खान यांची नियुक्ती, त्यांच्याविरोधात आरोपांच्या फैरी आणि इतर अनेक गडबड गोंधळामुळे हे बोर्ड चर्चेत आले आहे.
Leave a Reply