• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महागड्या फेशियलची गरज नाही, रोज फक्त ५ मिनिटे करा हा उपाय

April 17, 2026 by admin Leave a Comment


उन्हाळ्यातील वाढते तापमान आणि प्रदूषणामुळे चेहऱ्यावर डाग, मुरुमे आणि निस्तेज त्वचा या सामान्य समस्या प्रत्येकाला होतात. यासाठी अनेकजण महागड्या ब्युटी प्रोडक्टवर आणि पार्लरमधील ट्रिटमेंटवर हजारो रुपये खर्च करूनही चमकदार त्वचा मिळवता येत नाही. आयुर्वेद एक साधा, स्वस्त आणि प्रभावी घरगुती उपाय सुचवतो, तो म्हणजे कोरफड आणि हळदीचा फेस पॅक.

तर कोरफड आणि हळद दोन्ही त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. या दोन्ही गोष्टी एकत्र मिक्स करून लावल्याने त्वचेला खोलवर पोषण मिळते. यासोबतच त्वचेचा दाह कमी करते आणि मुरुमे व डागांपासून सुटका मिळवण्यास मदत करते. हा नैसर्गिक फेस पॅक उन्हाळ्यातील त्वचेच्या काळजीसाठी अत्यंत प्रभावी आहे. नियमित वापरामुळे डाग कमी होतात, त्वचेला आर्द्रता मिळते आणि त्वचेची नैसर्गिक चमक परत येते.

हळद-कोरफडीचे फायदे

कोरफडीमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामूळे हे घटक त्वचेला आर्द्रता देते, जळजळ आणि दाह कमी करते, तसेच उन्हामुळे टॅन झालेल्या त्वचेपासून आराम देते. दुसरीकडे हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचा घटक असतो, जो दाहशामक आणि जीवाणूनाशक गुणधर्मांनी समृद्ध असतो. ती मुरुमे, डाग आणि सुरकुत्या कमी करते, तसेच त्वचेचा रंग सुधारते

हळद-कोरफड फेस पॅकचे फायदे

या दोन्हींपासून बनवलेला फेस पॅक त्वचेतील विषारी घटक काढून टाकण्यासोबतच मृत त्वचा देखील काढून टाकतात, त्वचेची छिद्रे स्वच्छ करतो आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतो. तर हा पॅक त्वचेवरील काळे डाग आणि वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यासही मदत करू करतात.

हळद-कोरफड फेस पॅक कसा बनवायचा?

हा पॅक बनवण्यासाठी, 2 मोठे चमचे ताजा कोरफडीचा गर घ्या. त्यात अर्धा चमचा हळद टाका. त्याऐवजी तुम्ही 1 चमचा मध किंवा दही देखील मिक्स करू शकता. पेस्ट तयार होईपर्यंत चांगले मिसळा. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर हा पॅक 10-15 मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर, कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा याचा वापर केल्याने तुमचा चेहरा चमकदार आणि मुलायम होईल.

टीप: उन्हाळ्यातील त्वचेच्या काळजीसाठी महागड्या उत्पादनांपेक्षा हा घरगुती कोरफड आणि हळदीचा पॅक एक चांगला पर्याय असू शकतो. मात्र संवेदनशील त्वचा असलेल्यांनी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लग्नानंतर आडनाव बदलणे बंधनकारक आहे का? भारतीय कायदा काय म्हटलंय?
  • Amit Thackeray | नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर…
  • Sharad Pawar : पुढच्या तीन दिवसात महत्वाची राजकीय घडामोड, मोठा नेता शरद पवारांची साथ सोडू शकतो
  • TV9 Corporate Badminton Championship Season 2 : TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!
  • आज माझी ती इच्छा पूर्ण झाली..; सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी भावूक पोस्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in