• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

TV9 Corporate Badminton Championship Season 2 : TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!

April 17, 2026 by admin Leave a Comment


बॅडमिंटनप्रेमी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ‘TV9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप सीझन 2’ लवकरच सुरू होणार असून, या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. पहिल्या सीझनला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर यंदाच्या स्पर्धेबाबत उत्सुकता वाढली आहे.

ही स्पर्धा 15 ते 17 मे 2026 दरम्यान हैदराबादमधील Pullela Gopichand Badminton Academy येथे पार पडणार आहे. TV9 नेटवर्ककडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे भारतातील आघाडीच्या बॅडमिंटन खेळाडूंना घडवणाऱ्या प्रतिष्ठित अकॅडमीत खेळण्याची संधी सहभागी खेळाडूंना मिळणार आहे. तसेच, विविध कॉर्पोरेट कंपन्यांचे कर्मचारी आणि अधिकारी यांना क्रीडेमार्फत एकत्र येत नेटवर्किंग करण्याचीही संधी मिळणार आहे.

यंदा स्पर्धा अधिक व्यावसायिक पद्धतीने आयोजित केली जाणार असून, आधुनिक तंत्रज्ञानासह अनुभवी अंपायर्सच्या उपस्थितीत सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे स्पर्धेची रंगत आणखी वाढण्याची शक्यता आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अशोक खरात प्रकरणी प्राजक्ता माळीकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, सुषमा अंधारे भडकल्या, म्हणाल्या- हे हास्यजत्रेपेक्षा..
  • Walmik Karad Health Update | संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपीची तब्येत बिघडली
  • एलपीजी आणि कच्च्या तेलावर सरकारचे मोठ अपडेट, काय म्हणाले सरकार ?
  • इराणने दाबली अमेरिकेची दुखती नस, युद्ध वेगळ्या स्थितीत, थेट..
  • निर्दयी आचाऱ्याने चिमुकल्याला थेट तंदुरमध्ये फेकलं; चूक फक्त एवढीच की… संतापजनक घटनेने देश हादरला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in