
इराण आणि अमेरिका युद्धात अनेक देशांची वाट लागली. होर्मुज खाडी बंद असल्याने नाकीनऊ येण्याची वेळ आली. इराण आणि अमेरिका युद्धात युद्धबंदी करारावर चर्चा सुरू आहे. इस्लामाबादमधील बैठकीत कोणतीही निर्णय झाला नाही. त्यानंतर अमेरिकेने जगाला धक्का देत होर्मुज खाडीत नाकेबंदी केली. अमेरिकेने केलेल्या या नाकेबंदीमुळे कुठे ना कुठे इराणला धक्का बसला. इराणच्या बंदरातून एकही जहाज पुढे जाऊ शकत नाही. इराणला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला. यादरम्यानच इराणकडूनही अमेरिकेला धक्का देण्यात आला. अमेरिकेच्या दुखत्या नसेवर इराणने बोट ठेवले, ज्यानंतर आता हाहाकाराला सुरूवात झाली. अमेरिका मोठ्या कोंडीत सापडली आहे. अमेरिका होर्मुज खाडीत इराणच्या लपलेल्या एका खनिन्याच्या मागे आहे. त्याकरिता इतका मोठा उठा ठेवा अमेरिकेकडून करण्यात आला. अमेरिकेची क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, उपग्रह, एआय प्रणाली, डेटा सेंटर्स, सर्व फोन, लॅपटॉप हे सर्व कधीही बंद होऊ शकते. अरे हो तुम्ही अगदी खरे ऐकले… हे कधीही बंद होऊ शकते.
सेमीकंडक्टर चिप जी प्रत्येक संगणकात सर्किटरी असते. क्षेपणास्त्र ते लढाऊ विमाने, एआय चालवणाऱ्या डेटा सेंटर्सपर्यंतच्या सर्व आधुनिक प्रणालींना शक्ती देणाऱ्या प्रगत चिपचा प्रमुख घटक आहे. या सर्व चिप जवळपास 90 टक्के तैवानमध्ये बनवल्या जातात. जर या चिपची उत्पादने थांबली तर जग ठप्प होईल. सर्वात मोठा फटका जर कोणाला बसेल तर तो अमेरिका आहे.
आयटी, तंत्रज्ञान, अमेरिकेच्या उच्च-तंत्रज्ञान लष्करी प्रणाली व शस्त्रास्त्रांनाही धोका निर्माण होऊ शकतो. तैवानमध्ये सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. जी जगातील 90 टक्क्यांपेक्षा जास्त प्रगत चिपचे उत्पादन करते. अमेरिका या चिपचे उत्पादन करू शकत नाही. चिप बनवण्यासाठी सल्फ्यूरिक ॲसिडची आवश्यकता असते. त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. सल्फ्यूरिक ॲसिडशिवाय चिप्स बनवता येत नाहीत.
सल्फ्यूरिक ॲसिडचा होर्मुजशी काय संबंध आहे? गंधकापासून सल्फ्यूरिक ॲसिड हे गंधकाचे ॲसिड आहे. गंधक तेलापासून तयार होते. जेव्हा रिफायनरीमध्ये कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाते, तेव्हा त्यातून गंधक वेगळे काढले जाते. आखाती देशांमधील गंधक होर्मुजच्या खाडीतून आशियातील तैवानला पाठवले जाते. त्यामध्ये आता अमेरिकेची हीच मोठी दुखती नस इराणकडून दाबण्यात आली.
Leave a Reply