• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Balen Shah : बालेन शाहा यांचा भारताला पहिला सर्वात मोठा धक्का, नेपाळचे पंतप्रधान होताच केली थेट मोठी घोषणा

April 17, 2026 by admin Leave a Comment


नेपाळमध्ये सत्तांतर झालं आहे. बालेन शाहा नेपाळचे नवे पंतप्रधान झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपलं परराष्ट्र धोरण देखील जाहीर केलं होतं. नेपाळ आपल्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणासोबतच देशाच्या आर्थिक विकासावर भर देणार असल्याचं त्यांनी आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये म्हटलं होतं. नेपाळला मध्यस्थाच्या भूमिकेतून बाहेर काढून नेपाळला असा ब्रिज बनवायचा आहे, जो आर्थिक विकासाच्या मार्गाने आपल्या शेजारील देशांना जोडला जाईल, असंही ते म्हणाले होते. दरम्यान भारत आणि चीन सोबत नेपाळचे संबंध कसे असतील हे स्पष्ट करताना त्यांनी म्हटले होतं की आम्ही दोन्ही देशांसोबत समान संबंधांना प्राधान्य देऊ, मात्र आता बालेन शाहा यांनी भारताला पहिला मोठा झटका दिला आहे. नेपाळच्या पंतप्रधानांकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

बालेन शाहा अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे, त्यांनी नेपाळमध्ये ज्या पद्धतीने घोषणांचा धडका लावला आहे, त्यावरून देशात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. बालेन शाहा यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी भारतीय मालावर टॅरिफ लावला आहे. भारतामधून नेपाळमध्ये येणाऱ्या 100 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालावर आयात शुल्क आकारण्याचे आदेश सरकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. बालेन शाह यांच्या आदेशानंतर आता नेपाळ पोलिसांनी त्यांच्या चौक्यांवरील बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवला आहे.

नेपाळमधील व्यापाऱ्यांनी बालेन शाह यांच्याकडे अशी तक्रार केली होती, की नेपाळमधील सीमावर्ती भागामध्ये जे नागरिक राहतात ते कोणत्याही वस्तू खरेदी करण्यासाठी भारतीय बाजारपेठेत जातात. नेपाळी नागरिक भारतीय बाजारपेठेतून सामान खरेदी करत असल्यामुळे आम्हाला त्याचा प्रचंड तोटा होत आहे. व्यापाऱ्यांच्या या तक्रारीवर तोडगा काढण्यासाठी आता बालेन शाहा यांनी मोठी घोषणा केली आहे. बालेन शाहा यांनी भारतामधून येणाऱ्या 100 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सर्व प्रकारच्या सामानांवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. एवढंच नाही तर भारतीय रजिस्टर वाहणांवर देखील कस्टम ड्युटी लावण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • गाडीला स्क्रॅच किंवा डेंट लागणार नाही, नवीन ड्रायव्हर्सनी ‘या’ 5 गोष्टींची नक्की काळजी घ्या
  • कधी काळी एकमेकांचे कट्टर दुश्मन होते, आज गळ्यात गळे घालतात हे देश !
  • IPL 2026 Poits Table : गुजरातला सलग तिसऱ्या विजयानंतर तगडा फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी झेप?
  • OnePlus Pad 4 दमदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह 30 एप्रिल रोजी भारतात होणार लाँच
  • SRH vs CSK Live Streaming : हैदराबाद-चेन्नईमध्ये कडवी झुंज, कोण जिंकणार तिसरा सामना?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in