• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Amit Thackeray | नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर…

April 17, 2026 by admin Leave a Comment


नाशिक शहरातील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्नांचे गंभीर प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर मनसे नेते अमित ठाकरे यांनी आक्रमक भूमिका मांडली आणि स्पष्ट वक्तव्य केलं.

अमित ठाकरे यांनी धर्मांतरणाबाबत बोलताना सांगितले की, असे प्रकार पुन्हा होणार नाहीत याची जाणीव करुन द्या. जर मी या जागी असोत तर मी आरोपींना फाशी दिली असती. या नंतर त्यांनी ड्रग्स, तस्करी तसेच अनेक प्रकरणांवर भाष्य करत सरकार वर थेट निशाणा साधला.

याआधी संबंधित प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत अनेक आरोपींना अटक केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मिटींगच्या नावाखाली महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत मानसिक छळ आणि आक्षेपार्ह टिप्पणी करून त्यांचे मानसिक खच्चीकरण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून असिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन यांना अटक करण्यात आली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अशोक खरात प्रकरणी प्राजक्ता माळीकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, सुषमा अंधारे भडकल्या, म्हणाल्या- हे हास्यजत्रेपेक्षा..
  • Walmik Karad Health Update | संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपीची तब्येत बिघडली
  • एलपीजी आणि कच्च्या तेलावर सरकारचे मोठ अपडेट, काय म्हणाले सरकार ?
  • इराणने दाबली अमेरिकेची दुखती नस, युद्ध वेगळ्या स्थितीत, थेट..
  • निर्दयी आचाऱ्याने चिमुकल्याला थेट तंदुरमध्ये फेकलं; चूक फक्त एवढीच की… संतापजनक घटनेने देश हादरला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in