
Oppo Find X10 Series सिरीजबाबत नवीन माहिती समोर येत आहे, ज्यामध्ये Find X10, Find X10 Pro आणिFind X10 Pro Max यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. एका टिपस्टरने अलीकडेच स्टँडर्ड Find X10 चे स्पेसिफिकेशन्स लीक केले आहेत, ज्यानुसार यात फ्लॅट OLED स्क्रीनचा वापर सुरूच राहील, तर बॅटरीमध्ये लक्षणीय अपग्रेड मिळू शकेल. चला तर मग या ओप्पो एक्स सिरीजची फिचर्स अधिक माहिती जाणून घेऊयात.
Oppo Find X10 ची अपेक्षित वैशिष्ट्ये
टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनच्या वीबो पोस्टनुसार Oppo Find X10 मध्ये 1.5K रिझोल्यूशन असलेली 6.59-इंचाची फ्लॅट OLED स्क्रीन असू शकते. तसेच या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, यात दोन 200-मेगापिक्सेल कॅमेरे असण्याची शक्यता आहे. फाइंड एक्स१० सिरीज दोन हाय-रिझोल्यूशन सेन्सर्ससह लाँच होऊ शकतात.
या लीकमुळे बॅटरीमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. टिपस्टरच्या मते Oppo Find X10 मध्ये 8000mAh बॅटरी असेल. Oppo Find X9 मध्ये 7025mAh सिलिकॉन-कार्बन बॅटरी आहे, जी 80W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
मागील अहवालांनुसार Oppo Find X10 सिरीजमधील अद्याप लाँच न झालेले सर्व फोन्स 2nm MediaTek Dimensity 9600 चिपसेटवर चालतील. गेल्या वर्षीच्या Oppo Find X9 सिरीजच्या तुलनेत हे एक मोठे अपग्रेड असेल, जी ऑक्टा-कोअर ३एनएम मीडियाटेक डायमेन्सिटी 9500 चिपसह लाँच झाली होती. Find X10 मॉडेल्समध्ये इन- बिल्ट मॅग्नेट असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हे हँडसेट्स वायरलेस चार्जिंग ॲक्सेसरीज आणि फोन स्टँड्सना सहजपणे जोडता येतील.
फाइंड एक्स१० प्रो मध्ये ड्युअल 200-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप असू शकतो, ज्यामध्ये 1/1.3-इंचाचा 200-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 1/1.3-इंचाचा 200-मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा असेल. ओप्पोचा हा फोन सेल्फी कॅमेऱ्यासाठी 1:1 स्क्वेअर सेन्सरवर देखील काम करत आहे, जो ॲपलच्या आयफोन 17 मॉडेल्समध्ये आढळणाऱ्या सेंटर स्टेज कॅमेऱ्यासारखा असेल.
Leave a Reply