• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रामायणाबद्दल प्रकाश राज असं काही म्हणाले, थेट FIR दाखल; बीफ खाण्याबद्दलही वादग्रस्त विधान

April 17, 2026 by admin Leave a Comment


अभिनेते प्रकाश राज नेहमीच त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. यावेळी त्यांनी ‘रामायण’बद्दल एक अशी कथा ऐकवली आहे, ज्यावरून नेटकरी त्यांच्यावर खूप टीका करत आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी ‘रामायणा’च्या कथेचा उल्लेख करत राम आणि लक्ष्मण यांनी रावणाच्या बागेतून फळं चोरल्याचं म्हटलं आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हेगारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रकाश राज स्वत:ला नास्तिक मानतात आणि आता ‘रामायण’बद्दल त्यांनी ऐकवलेल्या कथेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

प्रकाश राज यांनी रामायणाची कथा त्यांच्या व्हर्जनमध्ये ऐकवली. ते म्हणाले, “राम, लक्ष्मण आणि सीता दक्षिणेच्या दिशेने येते होते. त्याचवेळी लक्ष्मणाने रामाला हाक मारली. राम म्हणाला, काय झालं लकी? लक्ष्मणाने सांगितलं की, इथे एक जंगला आहे. ते पाहून राम म्हणाला, नाही, हे कोणाचं तरी शेत आहे. तेव्हा लक्ष्मण विचारतो, इथे फळं आहेत, आपण ती फळं खाऊ शकतो का? त्यावर रामाने होकारार्थी उत्तर दिलं. पण ही चोरी होईल का, असा प्रश्न लक्ष्मण विचारतो. त्यावर राम म्हणतो, नाही, जर तुला भूक लागली असेल, तर तू फळं खाऊ शकतो.”

हीच कथा पुढे सांगताना प्रकाश राज म्हणाले, “राम आणि लक्ष्मण फळं खात असतानाच तिथे शूर्पणखा आणि रावण आले. त्यांना फळं खाताना पाहून शूर्पणखाला खूप राग आला. ती रावणाला म्हणाली, ही लोकं आपल्या बागेतील फळं खात आहेत. त्यावर रावणाने सांगितलं, ते उपाशी असतील, त्यांना खाऊ दे, त्यानंतर आपण त्यांच्याशी बोलू. फळं खाऊ झाल्यानंतर लक्ष्मण रामाला म्हणतो, इथे काही आदिवासी (रावण आणि शूर्पणखा) आले आहेत. त्यावर रावण सांगतो, नाही आम्ही याचे मालक आहोत.”

Big Breaking 🚨🚨🚨🚨

CONTROVERSIAL 🔴 🔴 🔴

A criminal complaint has been lodged against #PrakashRaj over remarks related to the #Ramayana on this video ⚠⚠⚠

As per the complaint;

“He allegedly made funny controversial comments suggesting Rama was from the North while… pic.twitter.com/rLkG08D2Vu

— Always Bollywood (@AlwaysBollywood) April 17, 2026

हीच कथा पुढे सांगताना प्रकाश राज यांनी त्याला जीएसटी आणि नॉर्थ-साऊथच्या चर्चेशी जोडलं. “रामाने सांगितलं की आम्ही फळं खाल्ली आहेत, तर आम्ही पैसेसुद्धा देऊ. त्यावर शूर्पणखा म्हणते, 2000 डॉलर्स तेसुद्धा जीएसटीसह. राम-लक्ष्मण म्हणतात की, आमच्याकडे पैसे नाहीत. त्यावर रावण त्यांना वीस टक्के डिस्काऊंट देतो. तरीसुद्धा राम आणि लक्ष्मण त्यांच्याकडे पैसे नसल्याचं स्पष्ट करतात. तेव्हा रावण त्यांना म्हणतो, जर डिस्काऊंट दिल्यानंतरही तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही इथे पर्यटक नाही आहात, जे फळाच्या शोधात आले होते. आता जर तुम्ही फळं खाल्लीच आहेत, तर त्याच्या बियांनी झाडं लावा आणि इथून जा”, असं ते पुढे सांगतात.

‘रामायण’चं स्वत:चं व्हर्जन ऐकवताना प्रकाश राज हे नॉर्थ-साऊथच्या वादावर निशाणा साधत होते. ते म्हणाले, “उत्तरेतून दक्षिणेकडे जाणारे लोक त्यांच्यावर बळजबरीने हिंदी भाषा थोपू नये. एखाद्या बँकेचा मॅनेजर बनून आम्हाला बीफ खाण्यापासून रोखू नका. आम्ही बीफ फेस्टिव्हलसुद्धा करू.” प्रकाश राज इथेच थांबत नाहीत, तर ते पुढे म्हणतात, “उत्तरेच्या लोकांनी दक्षिणेत येऊन काम करून आपल्या राज्यात परतले पाहिजेत. त्यांनी वन नेशन वन इलेक्शनसारख्या गोष्टी करू नयेत.” त्यांच्या याच वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

प्रकाश राज यांच्याविरोधात वकील अमिता सचदेवा यांनी दिल्ली पोलिसांच्या साऊथ डिस्ट्रिक्ट सायबर सेलकडे तक्रार नोंदवली आहे. सचदेवा यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर सांगितलं की त्यांनी, प्रकाश राज यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 299, 302, 196, 352 आणि 353 अंतर्गत आयटी अॅक्टसह तक्रार दाखल केली आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर… आरोपींमध्ये वाद अन् परतवाडातील अत्याचार प्रकरण उघडकीस
  • उन्हाळ्यात EV ची रेंज कमी होतेय? ‘या’ 5 सोप्या टिप्सने वाढवा बॅटरी बॅकअप
  • आरसीबीच्या सामन्यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार, कँटिनमध्ये काम करणाऱ्यावर खळबळजनक आरोप
  • अशोक खरात प्रकरणी प्राजक्ता माळीकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, सुषमा अंधारे भडकल्या, म्हणाल्या- हे हास्यजत्रेपेक्षा..
  • Walmik Karad Health Update | संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपीची तब्येत बिघडली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in