• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sushma Andhare : महिलांच्या हक्कासाठी बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता, तुमची तयारी आहे का राजीनामा द्यायची? सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

April 21, 2026 by admin Leave a Comment


गेल्या आठवड्यात संसदेत महिला आरक्षण विधेयक बिल नामंजूर झाल, त्यानंतर भाजपाने, सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर तोंडसुख घेत त्यांना महिला विधेयकाचे हत्यारे म्हटलं. काल आणि आजही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडत काँग्रेससह विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. सत्ताधारी सातत्याने खोटे बोलतात अशी टीकाही त्यांनी केली. मात्र त्यांच्या या टीकेला आता विरोधी पक्षांकडूनही प्रत्युत्तर दिलं जात असून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या, सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली. देवेंद्र फडणवीस काल रेटून खोट बोलत होते असं अंधारे यांनी म्हटलं. एवढंच नव्हे तर जेव्हा महिला आरक्षणाचं हे बिल २०२३ मध्ये संसदेत मांडल जात होतं, त्यावेळचं भाषणही सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलं.

तसेच सगळ्यात आधी महिला आरक्षणाची भ्रूण हत्या 1951 मध्ये झाली असं सांगत बाबासाहेब आंबेडकर हे बिल मांडत होते त्यावेळी या लोकांनी कडाडून विरोध केला होता. तेव्हा 1951 साली बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता असं म्हणत, महिलांसाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायची तुमची तयारी आहे का ? असा थेट सवाल सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला.

सुषमा अंधारे यांची टीका

देवेंद्र फडणवीस यांनी 2023 मध्ये ट्विट केलं होतं त्या ट्विटचा अर्थ काय घ्यायचा. त्यात त्यांनी ऐतिहासिक क्षण असं लिहिलं होतं, असं म्हणत अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट वाचून दाखवलं .  हे काय होतं हे फडणवीस यांनी समजावून सांगावं. जर आता तुम्ही म्हणत असाल की विरोधकामुळे विधेयक पडलं, तर या ट्विटचा अर्थ काय , असा सवाल त्यांनी विचारला. अमित शहा यांनी देखील 2023 मध्ये एक ट्विट केलं आहे , यावर फडणवीस साहेब तुमचं काय म्हणणं आहे ?खरं कोण बोलत आहे आणि खोटं कोण बोलत आहे ? हे लोकांना कळू द्या , असं अंधारे म्हणाल्या.

2023 मध्ये महिला आरक्षण लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झालं असं ट्विट अमित शहा यांनी केलं होतं. देवेंद्र फडणवीस काल रेटून खोट बोलत होते अशी टीका अंधारे यांनी केली. जेव्हा महिला आरक्षणाच हे बिल २०२३ मध्ये संसदेत मांडल जात होत त्यावेळचं भाषण सुषमा अंधारे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत ऐकवलं. बिल पास झालं अस त्यावेळी अमित शहा यांनी सांगितलं होतं. काल विधेयकाची हत्या झाली अस फडणवीस म्हणाले, भृण हत्या हा शब्द त्यांनी वापरला. पण त्यांना या शब्दाचा अर्थ कळला नसेल, त्यांना या शब्दाच गांभीर्य नाही.

1915 मध्ये झाली महिला विधेयकाची हत्या

महिलांच्या हक्काच्या विधेयकाची भ्रूण हत्या जर कोणी केली असेल तर ती सगळ्यात आधी 1951 साली झाली. जेव्हा या देशाच्या या पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा महिलांच्या अधिकारासाठी बिल मांडलं होतं, तेव्हा या विधेयकाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहानुभूतीधारक असणाऱ्या डॉ. शामा प्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय यांनी विरोध केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बिल मांडत होते त्यावेळी या दोघांनीच या बिलाला कडाडून विरोध केला होता. ‘ जर मी या खुर्चीवरून न्याय देऊ शकत नाही तर मला पदावर राहण्याचा अधिकार नाही ‘ असं म्हणत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पदाचा राजीनामा दिला होता. ते खरे महिलांचे कैवारी होते. तुमची तयारी आहे का मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायची ? असा थेट सवाल अंधारे यांनी विचारला.

तुम्ही काल खूप आव्हानं दिली. तुम्हाला माझे आव्हान आहे की महात्मा फुले यांनी लिहिलेल्या दोन पुस्तका दोन पुस्तकांचं वाचन तुम्ही RSS च्या वार्षिक कार्यक्रमात करणार का? गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा आसूड हे फडणवीस यांनी वाचून दाखवावं, किमान या पुस्तकावर मोहन भागवत यांची काय प्रतिक्रिया आहे ते तरी विचारावं, असं थेट आव्हानही अंधारे यांनी दिलं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sushma Andhare Full Press | महिला आरक्षणावरून 2023 ट्विट्सचा दाखला देत अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल; राजीनामा द्यायला तयार आहात का?
  • Pahalgam | Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दिलासा; पहलगाम हल्ल्यातील शहीद आदिल शहाच्या कुटुंबासाठी उभारलं नवं घर
  • यावर्षी विसर्जनानंतरही थांबणार..; कोकणातील पार्श्वभूमीवर उलगडणारा ‘गणा धाव रे’
  • एकनाथ शिंदे यांनी शब्द पाळला, पदरचे 10 ते 12 लाख खर्चून पहलगाममध्ये आदिल शहाच्या कुटुंबाला बांधून दिलं घरं
  • भारतात 100 वर्षे पूर्ण केलेली ऐतिहासिक रेल्वे स्थानके कोणती? तीन तर आपल्या महाराष्ट्रातच… तुम्हाला माहितीये का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in