• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एकनाथ शिंदे यांनी शब्द पाळला, पदरचे 10 ते 12 लाख खर्चून पहलगाममध्ये आदिल शहाच्या कुटुंबाला बांधून दिलं घरं

April 21, 2026 by admin Leave a Comment


गेल्या वर्षी पहलगाम येथील बैसरन व्हॅलीत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटकांचा जीव वाचवण्यासाठी धाडसाने पुढे सरसावलेला आदिल सय्यद शहा दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झाला होता. त्याचा भाऊ नौशाद शहा याने आदिलच्या आठवणींना उजाळा दिला आहे. संकटाच्या त्या क्षणी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आदिल शहा यांनी पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. रायफलही रोखली होती. दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. आदिलच्या या शौर्यामुळे अनेक पर्यटकांचे प्राण वाचू शकले, अशी माहिती भावाने दिली आहे. आदिल शहा हे व्यवसायाने पोनी चालक होते आणि ते पर्यटकांना घोड्यावरून परिसरात फिरवण्याचे काम करत होते.

मात्र त्यांच्या निधनानंतर पहलगाम परिसरात त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले असून कुटुंबीय अतिशय हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगत होते. ही बाब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ पुढाकार घेत आदिल शहा यांच्या कुटुंबासाठी नवीन पक्के घर बांधून देण्याचा निर्णय घेतला, ज्याचं त्यांनी स्वागत केलं. माणूसकीवर विश्वास बसला असं त्यांनी स्पष्ट केलं.

नवीन बांधून दिलेल्या घराची किंमत किती?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या पोनी चालक आदील हुसेन शहा यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेकडून नवीन पक्कं घर बांधून देण्यात आलं. या घराची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. सुमारे 10 ते 12 लाख रुपये खर्चून बांधलेलं हे एकमजली घर मजबूत सिमेंट-काँक्रीटचं असून त्यामध्ये प्रशस्त हॉल, स्वयंपाकघर, दोन बेडरूम आणि स्वच्छतागृहाची सुविधा देण्यात आली आहे. पूर्वी आदील यांचे कुटुंब माती आणि लाकडाच्या जुन्या घरात राहत होते.

घर त्यांच्या कुटुंबासाठी मोठा आधार

आदील यांचे वडील इक्बाल शहा यांनी भावनिक प्रतिक्रिया देताना सांगितले, “पर्यटकांनी पुन्हा येथे यावे, घाबरू नका. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. आमच्या मुलाने देशासाठी बलिदान दिले, त्यामुळे आम्हाला अभिमान आहे.” त्यांनी शिवसेनेचे आभार मानत हे घर त्यांच्या कुटुंबासाठी मोठा आधार असल्याचे नमूद केले.

युवा सेनेचे मराठवाडा विस्तारक बाजीराव चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या घराचा आज सय्यद कुटुंबियांना ताबा देण्यात येणार आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत या घराचा ताबा देण्यात येणार आहे. आज पार पडणाऱ्या या कार्यक्रमाला अंतिम स्वरूप देण्यासाठी आज शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ आणि नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सय्यद कुटुंबीयांची भेट घेऊन या कार्यक्रमाची रूपरेषा त्यांना समजावून सांगितली.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुमची लॉटरी पक्की! पैसे दुप्पट होणारच…; पोस्ट ऑफिसची मनी डबल योजना माहिती आहे का?
  • हिट सिनेमा देऊनही ऐश्वर्याची बहिण इंडस्ट्री बाहेर, धक्कादायक वास्तव, आता जगतेय भयानक आयुष्य!
  • इराण, अमेरिकेनं युद्ध थांबवलंच नाही तर भारतात उसळणार महागाईचा आगडोंब, काय काय होणार महाग? वाचा संपूर्ण यादी
  • टॉपलेस सीन देऊन या अभिनेत्रीने उडवली होती खळबळ, 61 व्या वर्षी फेसबुक फ्रेंडसोबत केलं लग्न
  • Tim Cook: CEO म्हणून नाही तर शेअरमुळे नवकोट! ॲप्पलचे सीईओ टिम कुक हे इतक्या संपत्तीचे धनी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in