• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Supriya Sule : शरद पवार गटात मोठी उलथापालथ होणार; सलग दोन दिवस बैठक, महत्त्वाची घोषणा होणार, सुळेंनी दिली माहिती

August 15, 2026 by admin Leave a Comment


शरद पवार गटातील राज्य पातळीवरील प्रवक्ता पदावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी प्रवक्ते पदाच्या नियुक्त्या अचानक रद्द करण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं होतं. आता दोन दिवसांनंतर पुन्हा नव्या नियुक्त्या जाहीर केल्या जाणार आहेत. यासाठी सलग दोन दिवस बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीनंतर शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुळे यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांच्या यादीबाबत महत्त्वाचं भाष्य केलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘आता आमच्या पक्षाचे दोनच प्रवक्ते आहेत. आज आणि उद्या पक्षाची सविस्तर बैठक होईल. ही बैठक प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात होईल. त्याबाबत शिंदे हे आज आणि उद्या निर्णय घेतील. पक्षाचे सध्या महाराष्ट्रात दोन प्रवक्ते आहेत. पण पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अद्याप कायम आहे. बैठकीत राज्यातील प्रवक्त्यांची यादी तयार केली जाणार आहे. ही यादी पुढील दोन दिवसांनी समोर येईल. या बैठकीतून महत्त्वाची माहिती मिळेल’.

पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून महिला आरक्षण विधेयकावर भाष्य केलं. यावर सुळे म्हणाल्या, ‘महिला आरक्षणाच्या बाबतीत पक्ष एकाच मताचे आहेत. सर्व राजकीय पक्षांची इच्छा आहे की, महिला आरक्षणाची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी. हे विधेयक एका मताने 2023 मध्ये सगळ्यांनी पारित केलं आहे’.

PM मोदींच्या निर्णयाचं सुळेंकडून स्वागत 

स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना ऑनलाइन कॉचिंगची सेवा मोफत मिळणार आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केली. यावर सुळे म्हणाल्या, आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. या कोचिंग क्लासवर कोणतंही नियंत्रण नव्हतं. कोचिंग क्सासविषयी सातत्याने तक्रारी येत होत्या. त्यामुळे कोचिंग क्लासेस नियंत्रणाखाली आणणे गरजेचे होते. मुलं कॉलेजमध्ये जात नव्हती. परंतु क्लासेसमध्ये जात होती. त्यामुळे यातून खूप मोठा बदल व्हावा. आता कोणताही पेपर फुटू नये. नीट पेपरही फुटू नये, अशी आमची इच्छा आहे’.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in