• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Supriya Sule : ‘मी या विषयावर बोललेलं लोकांना आवडत नाही..’ अजितदादांच्या मृत्यूच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंच्या उत्तराचा रोख कोणाकडे?

September 10, 2026 by admin Leave a Comment


अक्षय मंकणी, प्रतिनिधी : बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या मुद्यावर, त्यांच्या प्रश्नावर बोलल्या आहेत. “मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, विषय अतिशय गंभीर आहे. तातडीने बोलवून चर्चेतून मार्ग काढला पाहिजे. बदल अपेक्षित नाही. राजीनामा घ्या, नाही घ्या झालाच पाहिजे. यंत्रणेत सुधारणा झाली पाहिजे. परीक्षा जगात होतात. आयआयटी, आयआयएमची परीक्षा होते, तिथले पेपर का नाही फुटत?. उलट AI मध्ये बारामती, सातारा, सांगलीचा शेतकरी उतरला आहे. महाराष्ट्राच्या परीक्षांमध्ये या तंत्रज्ञानाचा का वापर होत नाही?” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला. “मला एका महिलेचा रात्री रडत फोन आला. ती MPSC च्या परीक्षेमुळे निराश झाली होती. ती आत्महत्येच्या विचारात होती. मी एक नागरिक म्हणून पोलिसांना स्क्रिनशॉट पाठवला. आज सकाळी मला पोलिसांचा फोन आला, त्यांनी सांगितलं की, आम्ही त्या महिलेला समजावलय. ही रात्री 12.30 ची घटना आहे. अशी एक केस नाही, सगळीकडे अशी परिस्थिती आहे. मुलं कष्ट करुन मेरिटवर पास होण्याचा प्रयत्न करतायत. यात चूक यंत्रणेची आहे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजित पवारांच्या मृत्यूबद्दल बोलणार नाही असं तुम्ही म्हटलय पण संजय राऊत बोलतायत की, अजित पवार कोणाची खासगी प्रॉपर्टी नाही, ते एवढे मोठे नेते होते, तर प्रश्न विचारले जाणार. त्यावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं. “राऊत साहेब राज्याचे नाही तर देशातील मोठे नेते आहेत. मी ठरवलेलं या विषयावर बोलणार नाही. तुम्हाला या विषयावर काहीही विचारायचं असेल तर या बद्दल सरकारला विचारलं पाहिजे. मी या विषयावर बोलणार नाही. मी या विषयावर बोललेलं लोकांना आवडत नाही. मला कोणाच्या भावनेचा अनादर करण्याची इच्छा नव्हती. मी पोटतिडकीने अंतकरणातून बोलली होती. लोकांना आवडत नसेल तर मी बोलणार नाही. सरकारमध्ये जे लोक आहेत, त्यांना प्रश्न विचारा” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

तुम्ही हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारा

पुणे कोंढवा जमीन घोटाळा प्रकरणात एफआयआरमध्ये पार्थ पवारांचं नाव नाही, त्यावर सुप्रिया सुळे बोलल्या की, “मुख्यमंत्री नवी मुंबईत आहेत, चॅनलवाले लाईव्ह आहेत तिथे. तुम्ही हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारा. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मुख्यमंत्री देऊ शकतील” “MPSC, UPSC च्या मुलांचे प्रश्न अतिशय गंभीर आहेत. सगळे आंदोलन करतायत. महागाई, भ्रष्टाचार, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. शेतकरी अडचणीत आहे. एवढी मोठी आव्हानं राज्यासमोर आहेत. महत्वाच्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षाशी कसं वागावं हा त्यांचा प्रश्न आहे. यूपीए सरकारच्या काळात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना घेऊन पवारसाहेब आले होते. त्यांनी 70 हजार कोटीची कर्जमाफी दिली” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
  • Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले…
  • ‘बानू’च्या जांभळ्या साडीमधील सौंदर्याने लावलं चाहत्यांना वेड, फोटो पाहून सर्वच थक्क
  • Brics Summit : आधी ताटकळत ठेवलं, आता अखेरच्या क्षणी चिनी राष्ट्रपती जिनपिंग यांनी भारत दौऱ्याबद्दल घेतला निर्णय
  • शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in