
‘जय मल्हार’ या लोकप्रिय मालिकेत बानूची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ईशा केसकर मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
आपल्या अभिनयासोबतच ईशा तिच्या स्टायलिश आणि आकर्षक लूकमुळेही कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर ती चाहत्यांसोबत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
नुकतंच ईशाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या नव्या फोटोशूटमध्ये तिचा पारंपरिक अंदाज पाहायला मिळत असून, तिच्या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
ईशाने या फोटोशूटसाठी जांभळ्या रंगाचा सुंदर पारंपरिक ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसवर सोनेरी रंगाच्या छोट्या बुट्ट्यांचं नाजूक डिझाइन असून, नारंगी रंगाच्या काठामुळे तिच्या पोशाखाला आणखी आकर्षक लूक मिळाला आहे.
आपला लूक अधिक खुलवण्यासाठी ईशाने कानात मोत्यांचे झुमके घातले आहेत. त्यासोबत हातात नाजूक ब्रेसलेट आणि घड्याळ परिधान करत तिने आपल्या स्टाइलमध्ये आणखी भर घातली आहे.




Leave a Reply