• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल

September 1, 2026 by admin Leave a Comment


खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. “चुकीच्या गोष्टीला आम्ही विरोध करणारच, मग ती कोणाचीही असो,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून मुलभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस दाखवला जात नाही, असा आरोप त्यांनी केला.

सुळे यांनी राज्यातील वाढत्या आंदोलनांकडे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या की, अंगणवाडी सेविकांचे आंदोलन, आदिवासी मुलांचे आंदोलन, कचरा डेपोचे प्रश्न, मुलांच्या शिक्षणाचा आणि आरोग्याचा मुद्दा, मराठा व ओबीसी समाजाची आंदोलने असे अनेक विषय राज्यभर धुमसत आहेत. सत्ताधारी पक्षाचे लोकही आता रस्त्यावर उतरत असल्याचे नमूद करत, “राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सत्ताधाऱ्यांच्याच आमदारांच्या कंपनीला निविदा दिल्या जात असल्याच्या आरोपांवर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला.

सुप्रिया सुळे यांनी महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या त्रिसूत्रीवर सरकारला धारेवर धरले. आज सकाळीच महागाई वाढल्याची बातमी समोर आली. रिक्षा, उबर, अन्नधान्य, दूध, पेट्रोल-डिझेल, सीएनजी या सगळ्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. “एक दिवस असा जात नाही की तुमच्या चॅनलवर आंदोलने दिसत नाहीत,” असे त्यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशवारी करू नका किंवा सोने खरेदी करू नका असे केलेले आवाहन हे आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून बोलत असलेल्या आर्थिक संकटाचीच पुष्टी करत असल्याचे सुळे यांनी सांगितले. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांनी अयोध्या येथील राम मंदिरातील चोरीचा उल्लेख करत “प्रभू श्रीरामाच्या मंदिरातही चोरी होते, यापेक्षा भयानक भ्रष्टाचार कुठला?” असा सवाल विचारला. पेपरफुटी, विशेषतः पुणे महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता परीक्षेतील घोळ आणि छुपा कॅमेऱ्याने कॉपी केल्याचा प्रकार, यावरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. दररोज पेपर फुटत असताना प्रशासन काय करत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सुप्रिया सुळे यांनी न्यायव्यवस्थेतील कथित दुहेरी धोरणांवरही कडक टीका केली. त्या म्हणाल्या की, कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलन केल्याबद्दल जेलमध्ये टाकले जाते, तर पुण्यातील “कोयता गँग” सारख्या गुन्हेगारांना सरकार पकडू शकत नाही. ज्यांच्यावर ईडी, सीबीआय होती, त्यांना “वॉशिंग मशिनमधून क्लीन” करून मंत्री केले जाते, पण सामान्य आंदोलनकर्त्यांना थेट कोर्ट केसेस आणि जेल मिळते, हा कुठला न्याय, असा संताप त्यांनी व्यक्त केला. अमित ठाकरे यांनी पुणे येथील एका महाविद्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढल्याबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्यावर बोलताना, भोर येथील शेतकऱ्यांवर आंदोलन केल्याबद्दल दाखल झालेल्या केसेसचा संदर्भ दिला.

गणेशोत्सवातील डीजे आणि डॉल्बीच्या वापरावरून सुरू असलेल्या वादावर सुप्रिया सुळे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. प्रशासन पुणेकरांना न्याय का देत नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. या पुणेकरांनीच भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना मोठे मतदान दिले असतानाही, प्रशासकीय पातळीवर निष्क्रियता दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केला. खड्डे, चाकण येथील अपघाती मृत्यू यांसारख्या पायाभूत सुविधांच्या समस्यांवरही त्यांनी सरकारला जबाबदार धरले. “राज्यात केवळ आंदोलने, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारच दिसत आहे,” असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर सखोल प्रश्नचिन्ह उपस्थित केले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बहिष्कार, समोर आलं मोठं कारण
  • खतरनाक सीरिज, एकदा सुरुवात केली तर शेवटपर्यंत बघतात लोक, प्रत्येक भाग सुपरहिट, फ्रीमध्ये बघत आहेत लोक
  • MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
  • देशी ब्रँडची युकेत धमाकेदार एण्ट्री, लाँच केला 5000mAh बॅटरी आणि 50MP सेल्फी कॅमेरा फोन
  • अभिजीत दीपकेंचा सर्वात मोठा विजय, सरन्यायाधीशांनी दाखवली पॉवर, सीजेपीची दुसरी मागणी मान्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in