• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल

August 10, 2026 by admin Leave a Comment


राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाच्या संविधानाला डावलून तटकरे यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांनी ही तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.

दरम्यान, जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनीही तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर आरोप केले आहेत. तटकरे यांच्या कार्यक्रमात घोषणा दिल्यामुळे काही पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात अंतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. सुनील तटकरे यांच्या नियुक्तीविरोधातील तक्रारीवर निवडणूक आयोग काय निर्णय घेतो आणि या आरोपांवर तटकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in